
Twitter Blue Tick : "ब्लू टीक का गलत इस्तेमाल..."; तालिबान्यांच्या हाती आयतं कोलित
इलॉन मस्कने ट्वीटरचा ताबा घेतल्यानंतर कंपनीमध्ये अनेक बदल झाले आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा बदल म्हणजे ब्लू टीक. पैसे देऊन ब्लू टीक मिळवण्याच्या ट्वीटरच्या सिस्टीमचा गैरफायदा घेतला जात आहे.
पूर्वी केवळ अधिकृत खाती आणि प्रसिद्ध, विश्वासार्ह माहिती देणाऱ्या ट्वीटर अकाऊंटला ब्लू टीक देण्यात येत होती. मात्र इलॉन मस्कने कंपनी विकत घेतल्यावर हा नियम बदलला आणि जो पैसे देईल त्याला टीक द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आता तालिबान्यांनी स्वतःच्या ट्वीटर हँडलसाठी ब्लू टीक घेतल्याचं वृत्त बीबीसीने दिलं आहे.
या वृत्तानुसार, ट्वीटरच्या पेड व्हेरिफिकेशनसाठी सध्या तालिबानी नेते अर्ज करू लागले आहेत. सध्या तालिबानच्या दोन अधिकाऱ्यांना ब्लू टीक मिळालेली आहे. त्यांच्या काही समर्थकांचे ट्वीटर अकाऊंट्सही व्हेरिफाईड आहेत.
हेही वाचा - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा
इलॉन मस्कने बदललेल्या नियमांनुसार, आता ब्लू टीक पैसे देऊन कोणालाही मिळणार आहे. ट्वीटरचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी इलॉन मस्कने या नव्या योजना राबवण्याचं ठरवलं आहे.