ग्लोबल

डेल्टा व्हेरियंटचा धुमाकूळ; सिडनी शहरात कडक लॉकडाऊन

विनायक होगाडे

सिडनी : कोरोना विषाणूचा कहर अद्यापही जगभरात धुमाकूळ घालतो आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध तर काही ठिकाणी शिथिलता अशा पार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती सध्या हाताळली जात आहे. भारतात नुकतीच कोरोनाची दुसरी लाट थैमान माजवून ओसरली आहे. मात्र, तरीही अजून परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाहीये. कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरियंट्स समोर येत असून ते अधिकाधिक धोकादायक सिद्ध होत आहेत. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला डेल्टा व्हेरियंट हाच अनेक ठिकाणी चिंतेचं कारण बनला आहे. ऑस्ट्रिलियात हाच डेल्टा व्हेरियंट सध्या हाहाकार माजवतो आहे.

ज्या ठिकाणी कोरोना आटोक्यात आल्याची चिन्हे दिसत होती, त्या ठिकाणी या डेल्टा व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा घरात बसण्याची पाळी नागरिकांवर आलेली आहे. इस्रायल देशामध्ये मास्क लावण्यामध्ये सूट दिली गेली होती मात्र, आता पुन्हा एकाद त्या देशात मास्क अनिवार्य केला आहे. ब्रिटनमध्ये देखील कोरोनाचे आकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे त्याठिकाणी देखील लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते.

भारतात तर डेल्टा व्हेरियंटचं म्युटेशन डेल्टा प्लस समोर आलं आहे. त्यामुळे सध्या चिंतेचं वातावरण आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. तिथेही मोठ्या प्रमाणावर लोकांना संक्रमण होत असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच सिडनीमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे.

कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरामध्ये दोन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सेंट्रल आणि इस्टर्न सबअर्बमधील दहा लाखांपेक्षा अधिक लोक आधीपासूनच निर्बंधाखाली आहेत. मात्र, आता हे निर्बंध संपूर्ण शहरामध्येच लागू करण्यात आले असून हा लॉकडाऊन एक ते दोन आठवड्यांपर्यंतचा असू शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये शहरामध्ये 80 हून अधिक रुग्ण हे डेल्टा व्हेरियंटने संक्रमित आढळून आले आहेत. सिडनीमध्ये लॉकडाऊनची ही परिस्थिती 9 जुलैपर्यंत लागू असेल, अशी माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT