बायकोने मारलं तरी हे लोक मोदींनाच जबाबदार धरतील : फडणवीस

fadnavis
fadnavise sakal
Updated on

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas aghadi government) नेत्यांचे एकमेकांसोबत पटत नाही. हे सरकार एकमेकांचे लचके तोडायला तयार आहे. ज्याठिकाणी नापास झाले तिथे मोदीजींने हे करायला पाहिजे होते, असे एका सुरात बोलतात. एखाद्या दिवशी यांच्या बायकोने मारले तर मोदींनाच जबाबदार धरतील, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी केली. आज फडणवीसांच्या नेतृत्वात नागपुरात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन (bjp agitation for obc reservation) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. (opposition leader devendra fadnavis criticized mahaviaks aghadi minister in nagpur)

fadnavis
...तर राजकारणातून संन्यास घेईल, फडणवीसांची मोठी घोषणा

आमच्या काळात ओबीसीचे आरक्षण आम्ही टीकवले. ५७ टक्के आरक्षणनाने जि.प. निवडणुका घेण्याची परवानगी दिली होती. पण, या सरकारने हे लॅप्स केले. तुम्ही कायदा केला, तर त्या कायद्याने तुम्ही ५० टक्क्यांच्या वरचं आरक्षण वाचवू शकता आणि भाजपने ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण त्यावेळी वाचविले होते. मात्र, आता मंत्री विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि छगन भुजबळ हे ओबीसी नेते मोदीजींनी इम्पिरिकल डेटा दिला नाही, असा सूर लावत आहेत. काहीही झाले तरी मोदींनाच जबाबदार धरतात, अशी टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

ओबीसीला संविधानात भाजपने जागा दिली. ही जागा काँग्रेस राष्ट्रवादीने दिली नाही. आम्ही ओबीसीसाठी वेगळं खातं तयार केलं. या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत? तर दोन जणांनी ओबीसी आरक्षणविरोधात याचिका केली. त्यापैकी वाशिममधल्या काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडाऱ्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मग ओबीसी आरक्षण रद्द करणारे हे काँग्रेस आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Fadnavis Announces ₹48,000 Crore Farm Power Bill Waiver, Promises 12 Hours of Free Electricity
Monsoon Rain 
Devotion Meets Monsoon: Dnyaneshwar Maharaj Palkhi Receives Grand Welcome in Satara
engineering exam
Marathi News Esakal
www.esakal.com