Hindu worker shot dead by colleague in Bangladesh

 

esakal

ग्लोबल

Hindu Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या!, कामावर असताना सहकाऱ्यानेच झाडल्या गोळ्या

Hindu worker shot dead by colleague in Bangladesh: दोन आठवड्यात तिसरी घटना; बांगलादेशात हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांमुळे परिस्थिती चिंताजनक

Mayur Ratnaparkhe

Rising Violence Against Minorities in Bangladesh : बांगलादेशात आणखी एक हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. येथील  मैमनसिंग जिल्ह्यातील एका कापड कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या एका हिंदू कामगाराची सहकाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली आहे.  

या घटनेमुळे मागील दोन आठवड्यांत बांगलादेशात तिसऱ्या हिंदूची हत्या झाल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना सोमवारी संध्याकाळी पावणेसात वाजता भालुका उपजिल्हा परिसरातील लबीब ग्रुपच्या सुलताना स्वेटर लिमिटेड कारखान्यात घडली.

या घटनेत मृत्यू झालेल्या हिंदू व्यक्तीचे नाव बजेंद्र बिस्वास (वय-४२) आहे. तर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीचे नाव नोमान मिया (२९) असून, त्याला पोलिसांना अटक केली आहे. हे दोघेही कारखान्यातील एकाच युनिटमध्ये काम करत होते.

बांगलादेशमध्ये अन्सार हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक गणवेशधारी सहाय्यक दल आहे. अन्सार कर्मचाऱ्यांना अंतर्गत सुरक्षा ऑपरेशन्ससाठी तैनात केले जाते, ज्यामध्ये सरकारी कार्यालये, कारखाने, औद्योगिक युनिट्स आणि प्रमुख प्रतिष्ठानांचे रक्षण करणे समाविष्ट आहे. तसेच येथील कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी सरकारी शस्त्रे दिली जातात.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत हिंदू व्यक्ती आणि हल्लेखोर हे दोघेही कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते आणि अन्सार बॅरेकमध्ये राहत होते. दरम्यान, नोमान मियाने बिस्वासवर बंदूक रोखली. त्यानंतर काही क्षणातच गोळीबार झाला आणि बिस्वास जखमी झाला. यानंतर गंभीर जखमी बिस्वासला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT