Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

BEST Bus Accident near Bhandup Station : बसखाली आल्याने मृत्यू झालेल्या दोन्ही महिला कामावरून घरी येत होत्या, मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
BEST Bus Accident near Bhandup Station

BEST Bus Accident near Bhandup Station

esakal

Updated on

Major BEST Bus Accident Near Bhandup Station :भांडुपमध्येमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या ठिकाणी एका बसने चार ते पाच जणांना चिरडलं, ज्यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, बस खाली आल्याने मृत्यू झालेल्या दोन्ही महिला या कामावरून घरी जात होत्या. मात्र वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला.

 तर या अपघामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली.  हा अपघात बस नियंत्रणाबाहेर जाऊन घडल्याने घडला असून, यात काही लोक बसखाली चिरडले गेले, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

BEST Bus Accident near Bhandup Station
Rain Alert : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस पाच राज्यांमध्ये पावसाचा इशारा; थंडीचा कडाका आणखी वाढणार!

याबाबत प्राप्तमाहितीनुसार, ही बेस्टबस इलेक्ट्रिक होती आणि बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने नागरिकांना चिरडलं. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिस दाखल झाले आणि जखमींना तातडीने रूग्णालयात हलवलं गेलं आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com