Blast in Afghanistan esakal
ग्लोबल

अफगाणिस्तानच्या मशिदीत मोठा स्फोट; स्फोटात 20 हून अधिक जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आलीय.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधून (Afghanistan) एक मोठी बातमी समोर आलीय. उत्तर अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ (Mazar e Sharif) शहरातील एका मशिदीत मोठा स्फोट (Blast in Afghanistan) झालाय. या स्फोटात अनेकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं गुरुवारी स्थानिक तालिबान कमांडरच्या हवाल्यानं ही माहिती दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची भीती आहे.

मजार-ए-शरीफच्या तालिबान कमांडरचे (Taliban Commander) प्रवक्ते आसिफ वजेरी यांनी सांगितलं की, 'तुरुंगातील शिया मशिदीत हा बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येनं लोक जखमी झालेत.' मिळालेल्या माहितीनुसार, मजार-ए-शरीफशिवाय काबूल, नांगरहार आणि कुंदुजमध्येही स्फोट झालेत. मजार-ए-शरीफ येथील मशिदीमध्ये एकूण 4 स्फोट झाल्याचं सांगण्यात येतंय. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या स्फोटापूर्वी काबूलमध्ये (Kabul) रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुलं जखमी झाल्याचं वृत्त आहे. काबूलमध्ये आज ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्याच भागात दोन दिवसांपूर्वी 19 एप्रिल रोजी बॉम्बस्फोट झाला होता. एका शाळेत हा स्फोट झाला आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT