बारामुल्ला चकमकीत दहशतवादी 'कांतरू'सह तिघांना कंठस्नान, खोर्‍यात जोरदार गोळीबार I Lashkar-e-Taiba | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Yousuf Dar aka Kantroo

कांतरूची माहिती मिळाल्यानंतर बारामुल्लाच्या सीमेवर असलेल्या गावात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती.

Kashmir : बारामुल्ला चकमकीत दहशतवादी 'कांतरू'सह तिघांना कंठस्नान

लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) प्रमुख कमांडर आणि कुख्यात पोलीस-किलर मोहम्मद युसूफ दार उर्फ ​​कांतरू (Mohammad Yousuf Dar aka Kantroo) याच्यासह त्याच्या तीन साथीदरांना बुधवारी सकाळी काश्मीरमधील बारामुल्लात (Baramulla) झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलांनी यमसदनी धाडलं. बारामुल्ला खोर्‍यातील अनेक टार्गेट किलिंग्जमध्ये सहभाग घेतल्यानं कांतरू सुरक्षा दलांच्या हिटलिस्टवर होता. यादरम्यान जोरदार गोळाबार झाल्याचंही कळतंय.

हेही वाचा: जहांगीरपुरी : ओवैसींना पोलिसांनी रोखलं; घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त

दरम्यान, मार्चमध्ये बडगाम (Budgam) इथं विशेष पोलीस अधिकारी (SPO) मोहम्मद इश्फाक दार आणि त्याचा भाऊ उमर अहमद दार यांच्यासह स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांना मारल्याबद्दल किमान १४ प्रकारच्या एफआयआरमध्ये त्याचं नाव होतं. त्याच्यावर मोहम्मद समीर मल्ला या सैनिकाचं अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या नोंदीनुसार छळामुळं ७ मार्च रोजी मोहम्मद समीर मल्ला यांचा मृत्यू झाला होता.

तसंच एलईटी कमांडर असलेल्या ​​कांतरूवर गेल्या महिन्यात तगामुल मोहिदिन दार नावाच्या नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरक्षा दलांना काल रात्री या भागात कांतरूची माहिती मिळाल्यानंतर बडगाम आणि बारामुल्लाच्या सीमेवर असलेल्या गावात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी कांतरू आणि अन्य एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. अजून दोन दहशतवादी परिसरात लपून बसले असता, सुरक्षा रक्षकांनी कारवाई करून त्यांनाही ठार मारलं आहे.

हेही वाचा: कर्नाटकात भीषण अपघात; लग्न संपवून परतताना 6 जणांवर काळाचा घाला, 9 जखमी

भारत सरकारनं (Indian Government) गेल्या पंधरवड्यात बारामुल्ला खोर्‍यात कडक मोहीम राबवलीय. यामध्ये सज्जाद गुल, आशिक अहमद नेंगरू, मुश्ताक अहमद जरगर उर्फ लतराम, अर्जुमंद गुलजार जान उर्फ हमजा बुरहान, अली काशिफ जान, मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर आणि हाफिज तल्हा सईद यांच्यावर बंदी घालण्यात आलीय.

Web Title: Lashkar E Taiba Terrorist Cop Killer Kantroo Gunned Down In Kashmir Baramulla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top