climate-change sakal media
ग्लोबल

‘क्लायमेट चेंज’चा जगात पहिला रुग्ण

कॅनडातील महिलेला उष्णतेमुळे त्रास

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क, ता.९ ः जागतिक तापमानवाढीमुळे एकीकडे सृष्टीचा समतोल ढळू लागला असताना निसर्ग अधिक लहरी होताना दिसतो आहे. या संकटाचे दृश्‍य परिणाम आता मानवी आरोग्यावर देखील होऊ लागले आहेत.

कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया या प्रांतात उष्णतेच्या लाटेमुळे एका सत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेला श्‍वास घ्यायला त्रास होऊ लागला तसेच उष्माघातामुळे तिची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या महिलेच्या आजाराचे निदान करतानाच येथील स्थानिक डॉक्टरांनी प्रथमच क्लायमेट चेंज (वातावरणातील बदल) या शब्दाचा वापर केला आहे. कॅनडामध्ये उष्णतेच्या लाटेने आतापर्यंत पाचशेपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेतल्याचे बोलले जाते.

इटलीत ग्लास्गो येथे झालेल्या जागतिक संमेलनामध्येही नेमका हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. येथील कुटने प्रांतामध्ये अचानक वणवे भडकल्यानंतर संबंधित महिलेचा अस्थाम्याचा त्रास बळावल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर 11 वाजता अंत्यसंस्कार

Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले

Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

अजितदादांनी ऐकलं नाही! रात्रीच कारने बारामतीला जाऊया म्हणालो होतो; चालक श्यामराव मनवेंना अश्रू अनावर

Ajit Pawar : लोकनेता गमावला; विविध मान्यवर नेत्यांकडून श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT