PMC Corona  Sakal
ग्लोबल

कोरोना पुन्हा कहर करणार? चीननंतर या देशातही लाट

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाने (coronavirus) जगात चांगलाच हाहाकार माजवला होता. पहिल्या दोन लाटेत अनेक देशांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. यानंतर कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉन घेऊन आली. आता चौथी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. अशात चीनमध्ये कोरोनाने पुन्हा तोंडवर केले आहे. यामुळे येथे लॉकडाऊनही लावण्यात आले आहे. दुसरीकडे बुधवारी (ता. १६) दक्षिण कोरियामध्ये कोरोना संसर्गाची ४,००,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली.

दक्षिण कोरियाच्या माध्यमांनुसार, देशात दररोज ४,००,७४१ नवीन कोरोना (coronavirus) रुग्णांची नोंद केली जात आहे. जी मागच्या वर्षी जानेवारीमध्ये देशात कोरोना रुग्णांची नोंद झाल्यापासून सर्वाधिक आहे. यापैकी बहुतेक स्थानिक संसर्गाची प्रकरणे सांगितले जात आहे. म्हणजेच देशात कोरोनाचे स्थानिक संक्रमण सुरू झाले आहे. दक्षिण कोरियात (South Korea) आता एकूण रुग्णसंख्या ७,६२९,२७५ वर पोहोचली आहे.

दक्षिण कोरियासाठी (South Korea) मंगळवार सर्वांत प्राणघातक दिवस होता. २४ तासांत २९३ जणांचा मृत्यू झाल्याचे कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीने बुधवारी सांगितले. कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने शेन्झेनच्या दक्षिणेकडील टेक हबमधील सुमारे १७.५ दशलक्ष रहिवाशांना लॉकडाऊनमध्ये (lockdown) ठेवले आहे. याशिवाय शांघाय आणि इतर शहरांवरही निर्बंध लादले (lockdown) आहेत.

दुसरीकडे चीनला कोरोनाच्या (coronavirus) सर्वांत वाईट उद्रेकाचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये बुधवारी ३,२९० नवीन कोरोना प्रकरणे नोंदवली गेली. ज्यात ११ गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. चीनमध्ये २०१९ च्या उत्तरार्धात वुहानमध्ये प्रथम विषाणूचा संसर्ग झाला होता. तेथे एका वर्षाहून अधिक काळ अधिकृतपणे कोविड संबंधित मृत्यूची नोंद झालेली नाही, अशी बातमी एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT