Sundar Pichai 
ग्लोबल

Sundar Pichai : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान; म्हणाले, भारत माझाच...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारत हा माझाच एक भाग असून तो मी माझ्याजवळ ठेवतो, असे गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. भारतीय-अमेरिकन व्यापार आणि उद्योग प्रकारात पिचाई यांना २०२२ साठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ( Sundar Pichai news in Marathi)

५० वर्षीय पिचाई यांना शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि निकटवर्तींच्या उपस्थितीत भारतातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत एस. संधू म्हणाले की, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडे पद्मभूषण सुपूर्द करताना आनंद होत आहे. मदुराई ते माउंटन व्ह्यू हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. यामुळे भारत-अमेरिका आर्थिक आणि तंत्रज्ञानातील संबंधांना बळकटी मिळणार आहे. हे संबंध जागतिक नाविन्यपूर्णतेत भारतीय गुणवत्तेची पुष्टी करतात, असंही संधू म्हणाले. .

पिचाई म्हणाले की, सर्वोच्च पुरस्काराबद्दल मी भारत सरकार आणि भारतीय जनतेचा आभारी आहे. भारत हा माझाच एक भाग आहे. तंत्रज्ञानाचा लाभासाठी आम्ही एकत्र काम करत असताना गुगल आणि भारत यांच्यातील भागीदारी अशीच सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. भारत हा माझाच एक भाग आहे आणि मी जिथे जिथे जातो तिथे तो माझ्यासोबत घेऊन जातो," असे पिचाई यांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना म्हटलं. शिक्षण आणि ज्ञानाची आवड असलेल्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो हे माझे भाग्य आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT