Shahid Afridi Twitter
ग्लोबल

तालिबानी पंतप्रधान व्हायचंय? आफ्रिदीच्या 'बोलंदाजी'वर नेटकऱ्यांची फटकेबाजी

क्रिकेटमध्येही ते कोणताही व्यत्यय आणणार नाहीत, असा विश्वासही आफ्रिदीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.

सुशांत जाधव

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याने अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीचं समर्थन केले आहे. पुर्वीच्या तुलनेत तालिबानच्या मानसिकतेत मोठा बदल झालाय असे तो म्हणालाय. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर #Afridi हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आलाय. या हॅशटॅगच्या माध्यमातून अनेकजण त्याला ट्रोलही करताना पाहायला मिळत आहे.

अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानची राजवट आलीये. मोठ्या सकारात्मक मानसिकतेने ते आले आहेत. यापूर्वी त्यांची ही मानसिकता दिसली नव्हती. महिलांना कामाची परवानगी एवढेच नाही तर राजकीय आणि अन्य क्षेत्रात महिलांना प्राधान्य देण्याचं त्यांना मान्य आहे. हा तालिबानमधील मोठा बदल आहे. तालिबानी क्रिकेट प्रेमी आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्येही ते कोणताही व्यत्यय आणणार नाहीत, असा विश्वासही आफ्रिदीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. श्रीलंकेत कोरोनाचं संकट आल्यामुळे अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील मालिका रखडल्याचा उल्लेखही त्याने यावेळी केला.

तालिबानसंदर्भातील भाष्य करतानाचा आफ्रिदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या वक्तव्यावरुन त्याला ट्रोलही करण्यात येत आहे. दक्षिण आशियाई वार्तांकन करणाऱ्या Naila Inayat या महिला पत्रकाराने ट्विटरच्या माध्यमातून शाहिद आफ्रिदीला टोला लगावला आहे.

तालिबानचे समर्थन केल्यानंतर आफ्रिदी हा त्यांचा पुढचा पंतप्रधान असेल, असा टोला त्यांनी लगावलाय. काही दिवसांतच नव्या सकारात्मकतेसह आफ्रिदी तालिबानकडून क्रिकेट खेळणार आहे, अशा शब्दांतही काही नेटकरी त्याची शाळा घेताना दिसते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT