Henry Kissinger Died
Henry Kissinger Died 
ग्लोबल

Henry Kissinger Died: भारतीयांना 'भिकारडे' म्हणणारे हेन्री किसिंजर; इंदिरा गांधींबाबतही वापरले होते अपशब्द

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अमेरिकेचे माजी राज्य सचिव हेन्री किसिंजर यांचे बुधवारी वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. किसिंजर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यांनी रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड (१९६९ ते १९७७ दरम्यान) या दोन अध्यक्षांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या पदावर राहून सेवा दिली आहे.

किसिंजर यांचा भारतीयांबाबतचा द्वेष त्यांच्या वक्तव्यातून अनेकदा व्यक्त झालाय.(Former United States secretary of state Who was Henry Kissinger passed away on Wednesday at the age of 100 )

पाकिस्तानला केलं मित्र

किंसिंजर यांचा जन्म २७ मे १९२३ रोजी जर्मनीमध्ये झाला होता. १९३९ मध्ये ते नाझी जर्मनीमधून पळून अमेरिकेत आले होते. हार्वड विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असतानाच ते अमेरिकेच्या राजकारणात आले. शीत युद्धाच्या दरम्यान पाकिस्तान हा अमेरिकेचा दोस्त राष्ट्र होता. पाकिस्तानचे भौगोलिक स्थान तेव्हा अमेरिकेसाठी महत्त्वाचे होते. चीनसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ते पाकिस्तानला एक मध्यस्थ म्हणून पाहत होते. त्यावेळी ते निक्सन सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.

भारतीयांचा द्वेष

१९७१ साली पूर्व पाकिस्तान मुक्ती संग्रामात मोठ्या संख्येने बंगाली नागरिक भारतामध्ये आले होते. यावेळी किसिंजर यांनी संताप व्यक्त केला होता. भारतीय हे भीक मागणारे लोक आहेत, असं ते म्हणाले होते. किसिंजर यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी देखील अपशब्द वापरले होते. त्यांचं बोलणं रिकॉर्ड करण्यात आलं होतं. यात ते इंदिरा गांधी यांना म्हातारी चेटकीण, b*tch म्हणाले होते. गार्यिडन या वृत्त संस्थेने यासंदर्भातील बातमी दिली होती.

किसिंजर यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांना नोबेल पारितोषित जेव्हा जाहीर झाला तेव्हा नोबेल पुरस्कार समितीच्या दोन सदस्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तसेच कम्बोडियातील बॉम्बिंगसंदर्भात चौकशीचा आदेश द्याला लागला होता.

सल्लागार

आठ वर्षे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत असताना त्यांना राज्य सचिव देखील करण्यात आले. दोन्ही पदं ते एकाचवेळी सांभाळत होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठा बदल घडवून आणला. निवृत्तीनंतरही ते आंतरराष्ट्रीय नेत्यांना सल्ला देण्याचं काम करत होते.

गुप्त चर्चेच्या माध्यमातून त्यांनी अमेरिका आणि चीनमध्ये राजनैतिक संबंध घडवून आणले. पॅरिस चर्चेमध्ये त्यांनीच पुढाकार घेतला होता. व्हिएतनाममध्ये सन्मानपूर्वक युद्धातून माघार घेण्याचा त्यांनीच मार्ग तयार केला होता.वॉटरगेट घोटाळ्याप्रकरणाच्या गोंधळात त्यांची ताकद शिखराला गेली होती. त्यांनी अध्यक्षांच्या बरोबरीने निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला होता. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT