Iran Hijab Marathi News Iran Hijab Marathi News
ग्लोबल

हिजाबपासून मुक्तीसाठी महिला उतरल्या रस्त्यावर; कडाडून विरोध

सकाळ डिजिटल टीम

इराण : इराण या इस्लामिक देशात (Islamic countries) हिजाबला (Hijab) कडाडून विरोध केला जात आहे. इराणी महिला हिजाबचा निषेध करीत रस्त्यावर उतरल्या आहेत. इतकच नाही तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब काढतानाचा व्हिडिओही बनवत आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, महिला हिजाब काढतानाचे व्हिडिओ पोस्ट करून इस्लामिक रिपब्लिकच्या कठोर हिजाब नियमांचा निषेध करीत आहेत.

इराणच्या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी केस झाकणे (Hijab) बंधनकारक आहे. हिजाबबाबत सातत्याने निदर्शने होत असली तरी मंगळवारी देशभरात मोठ्या संख्येने इराणी महिलांनी हिजाबविरोधी मोहिमेत भाग घेतला. इराणच्या अधिकाऱ्यांनी १२ जुलै हा ‘हिजाब आणि शुद्धता दिवस’ म्हणून घोषित केला होता. याचा निषेध म्हणून महिला रस्त्यावर उतरल्या.

सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये महिलांव्यतिरिक्त पुरुषही इराणच्या कायद्याविरोधात निषेध करताना दिसत आहेत. काही व्हिडिओंमध्ये महिला रस्त्यावर स्कार्फ फेकताना दिसत आहेत. सार्वजनिक वाहतूक आणि दुकानांमध्ये महिला हिजाबशिवाय दिसत आहेत. इराणच्या सरकारने देशाच्या सुरक्षा दलांना हिजाब अनिवार्य करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. महिलांसाठी हिजाब अनिवार्य करण्यासाठी लष्कर प्रयत्न करीत आहे.

१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर हिजाब अनिवार्य

१२ जुलै रोजी देशात संभाव्य हिंसाचार होऊ शकतो. मोठ्या संख्येने लोकांना ताब्यात घेतले जाऊ शकते, असे न्यूयॉर्क स्थित इंटरनॅशनल कॅम्पेन फॉर ह्युमन राइट्स इन इराणने (ICHRI) ११ जुलै रोजी सांगितले होते. त्यानंतर एका वृत्तसंस्थेने सांगितले की, ११ जुलैलाच अनेकांना अटक केली होती. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणी महिला आणि ९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना सार्वजनिक ठिकाणी हिजाब (Hijab) अनिवार्य केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT