ग्लोबल

भारतासह 18 देशांची ECOSOC मध्ये निवड

सूरज यादव

कॅलिफोर्निया - युनायटेड नेशन्सच्या इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिलच्या समन्वयक मंडळामध्ये भारतासह अठरा देशांची निवड झाली आहे. या मंडळामार्फत युनायटेन नेशन्सच्या संस्थांचे सामाजिक कार्य केलं जातं. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. आमसभेचे अध्यक्ष वोल्कन बोझकिर यांनी गुप्त मतदानानंतर याची घोषणा केली.

एकूण अठरा देशांमध्ये मॉरिशिअस, टांझानिया, ट्युनिशिया हे आफ्रिकन देश आहेत. तर अफगाणिस्तान, भारत, कझाकस्तान, ओमान हे आशियातील देश आहेत. याशिवाय क्रोएशिया, झेक रिपब्लिक, चिली, पेरू, बेल्जियम, कॅनडा, इटली आणि युनायटेड स्टेटस यांचा समावेश आहे. या देशांची निवड पुढच्या तीन वर्षांसाठी झाली असून 1 जानेवारी 2022 पासून त्यांचा कार्यकाळ सुरु होणार आहे.

वेस्टर्न युरोपियन आणि इतर देशांच्या ग्रुपमध्ये ग्रीक, न्यूझीलंड आणि डेन्मार्क यांची निवड ही एक वर्षासाठी झाली आहे. त्यांचाही कालावधी पुढच्या वर्षी 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणार आहे. तीनही देशांची निवड स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि फिनलँड या देशांच्या जागी झाली आहे. तर जर्मनीच्या जागी इस्राईलची निवड दोन वर्षांसाठी झाली आहे.

ECOSOC मध्ये 54 सदस्य असून त्यांची निवड आमसभेकडून तीन वर्षांसाठी केली जाते. भौगोलिक स्थानानुसार याची विभागणी करण्यात आली असून यामध्ये आफ्रिकन देशांना 14 जागा, एशिया-पॅसिफिक देशांना 11, पूर्व युरोपियन 6, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांसाठी 10 तर पश्चिम युरोप आणि इतर देशांसाठी 13 जागा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT