ब्रिटनला राणीच्या कारकीर्दीच्या वर्धापनदिनाचे वेध

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयच्या कारकीर्दीच्या ७० व्या वर्धापनदिनाचे. पुढील वर्षी जून २०२२ मध्ये ९५ वर्षीय राणी आपल्या कारकीर्दीची ७० वर्षे पूर्ण करत आहे.
Elizabeth
ElizabethSakal

लंडन - चार दिवसांचा वैशिष्ट्यपूर्ण वीकेंड, बकिंघम पॅलेसमध्ये केलेले प्लॅटिनम पार्टीचे आयोजन, जगातील सर्वांत मोठ्या कलाकारांचे सादरीकरण, ब्रिटनच्या (Briton) राजधानीत राणीच्या (Queen) जीवनावरील पथनाट्ये. निमित्त आहे, ब्रिटनची राणी एलिझाबेथ (Elizabeth) द्वितीयच्या कारकीर्दीच्या ७० व्या वर्धापनदिनाचे. (Anniversary) पुढील वर्षी जून २०२२ मध्ये ९५ वर्षीय राणी आपल्या कारकीर्दीची (Career) ७० वर्षे पूर्ण करत आहे. एवढी प्रदीर्घ कारकीर्द अनुभवणारी पहिली ब्रिटिश सत्ताधीश ठरण्याचा मानही राणीने मिळविला आहे. या ऐतिहासिक घटनेनिमित्त ब्रिटनमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातून राणीच्या कारकीर्दीचा ७० वर्षांच्या प्रवास मांडला जाईल.

गेल्या वर्षभरापासून अधिक काळ कोरोनाच्या साथीत होरपळलेल्या ब्रिटनमध्ये या सर्वांमुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. वडिल किंग जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी राणीच्या कारकीर्दीस सुरवात झाली. पुढील वर्षी २ ते ५ जून या वीकेंडदरम्यान वर्धापनदिन सोहळा परमोच्च शिखर गाठेल. दोन जूनला विशेष संचलनाने त्याची सुरवात होईल. या काळात बॅंकांना सुटी जाहीर केली असून, लोकांना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बकिंघम पॅलेसच्या निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, ब्रिटनसह चॅनेल आयलंड, आयसल ऑफ मॅन आणि युके ओव्हरसीज टेरिटरीज या प्रदेशामध्ये दीपस्तंभ प्रजल्वित केले जातील. एवढेच नव्हे, तर नवी दिल्लीसह राष्ट्रकुल देशांच्या राजधानीतही प्रथमच दीपस्तंभ प्रजल्वित केले जाणार आहेत.

Elizabeth
Amazon चे सीईओ जेफ बेजोस करणार अंतराळ सफर!

प्रमुख कार्यक्रम

  • राणी एलिझाबेथ द्वितीयचे लंडनमधील सेंट पॉल्स कॅथेड्रलमध्ये आभार मानले जाणार

  • बकिंघम पॅलेसमध्ये जगभरातील प्रतिष्ठित कलाकारांची मैफिल रंगणार, बीबीसीवरून थेट प्रक्षेपण

  • लोकप्रतिनिधींना सोहळ्यासाठी अर्ज करावे लागणार

  • ब्रिटनसह राष्ट्रकुल देशांमध्ये पाच हजार जणांची शोभायात्रा

  • कला, संगीत, सर्कशीसह विविध महोत्सवाचे आयोजन

संचलनात १,४०० जवान, २०० घोडे

राणीचा वाढदिवस सामान्यत: जूनमधील दुसऱ्या रविवारी असतो. पारंपरिक संचलनात १,४०० जवान, २०० घोडे आणि ४०० संगीतकार सहभाग घेतील. बकिंघम पॅलेसपासून संचलनाला सुरवात होईल. या दिमाखदार संचलनात शाही राजघराण्याचे सदस्यही सहभागी होतील. त्यानंतर शाही हवाई दलाच्या कसरती पार पडतील. शाही घराण्याचे सदस्य बकिंघम पॅलेसच्या बाल्कनीतून या कसरती पाहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com