Mijito Vinito United Nations General Assembly esakal
ग्लोबल

UNGA : 'शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम'; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार

संयुक्त राष्ट्र महासभेत आज भारतानं पाकिस्तानच्या खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं.

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त राष्ट्र महासभेत आज भारतानं पाकिस्तानच्या खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं.

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations General Assembly) आज भारतानं पाकिस्तानच्या (India vs Pakistan) खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या मिशनचे प्रथम सेक्रेटरी मिजितो विनिटो (Mijito Vinito) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले, हे खेदजनक असल्याचं म्हटलंय.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात सुरू असलेले गैरप्रकार लपवण्यासाठी या व्यासपीठाचा उघडपणे गैरवापर केलाय. जो देश आपल्याला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांतता हवीय असा दावा करतो, तो कधीही सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहित करणार नाही किंवा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या (Mumbai Terror Attack) सूत्रधारांना आश्रय देणार नाही, असं त्यांनी पाकिस्तानला सुनावलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांनी या मंचावरून भारताला लक्ष केलंय. युद्ध हा काही उपाय नाही. शांततापूर्ण संवादानंच काश्मीर प्रश्न सुटू शकतो, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

भारतावर खोटे आरोप करण्याआधी पाकिस्ताननं स्वतःच्या काळ्या कारभाराचं स्पष्टीकरण द्यावं. जम्मू-काश्मीरवर दावा करण्याऐवजी इस्लामाबादनं सीमेपलीकडील दहशतवाद थांबवावा, असा सल्ला विनिटो यांनी पाकिस्तानला दिलाय. विनितो पुढं म्हणाले, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. अल्पसंख्याक समाजातील हजारो तरुणींचं अपहरण केलं जात आहे. पाकिस्तानात हिंदू, शीख आणि ख्रिश्चन कुटुंबातील मुलींचं बळजबरीनं अपहरण केलं जातं, त्यांचं लग्न केलं जातं आणि नंतर धर्मांतर करायला भाग पाडलं जातं. जगातील इतर देशांनी याची दखल घेतली पाहिजे. मानवी हक्कांबद्दल, अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल आणि मूलभूत शालीनतेबद्दल ही चिंतेची बाब आहे, असंही विनितो यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे विशेष गाड्यांचा कालावधी वाढवणार

SCROLL FOR NEXT