Ajay Banga 
ग्लोबल

Ajay Banga: जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा रोज कमावतात 'इतके' लाख रुपये, 'या' कंपनीत केली कामाची सुरुवात

भारतीय वंशाचे अजय बंगा यांची बुधवारी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राहुल शेळके

Ajay Banga: भारतीय वंशाचे अजय बंगा यांची बुधवारी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते आशियाई वंशाचे पहिले अध्यक्ष असतील. ते 2 जून 2023 रोजी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. विशेष म्हणजे अजय बंगा यांची बुधवारी 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने बिनविरोध निवड केली.

याआधी बंगा हे मास्टरकार्डचे सीईओही राहिले आहेत. त्यांना आर्थिक आणि विकास कामांचा मोठा अनुभव आहे. या कार्यकाळात त्यांच्यासमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान असणार आहे.यापूर्वी, जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडण्याची घोषणा केली होती.

जो बिडेन यांनी या पदासाठी केले नामांकन:

डेव्हिड मालपास यांनी राजीनामा जाहीर केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी फेब्रुवारीमध्ये अजय बंगा यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केले. तेव्हापासून अजय बंगा यांचे जागतिक बँकेचे अध्यक्ष होणे जवळपास निश्चित मानले जात होते.

कारण त्यांच्यासमोर अन्य कोणीही उमेदवारी सादर केली नाही. त्यांना नामनिर्देशित करताना जो बिडेन म्हणाले होते की, बंगा यांना हवामान बदलासारख्या आव्हानांचा सामना करण्याचा भरपूर अनुभव आहे.

अजय बंगा यांचे भारताशी विशेष नाते:

भारत हा अजय बंगांच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांचे पूर्ण नाव अजयपाल सिंग बंगा आहे. अजय बंगा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्यांचे वडील हरभजन सिंग बंगा हे भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल राहिले आहेत. त्यांचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधरचे आहे.

बंगा यांना 2007 मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाले. त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले. त्यांनी 1980 मध्ये नेस्ले इंडियामधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

त्यांनी 10 वर्षांहून अधिक काळ मास्टरकार्डचे सीईओ म्हणून काम केले. यासोबतच अमेरिकन रेडक्रॉस, क्राफ्ट फूड यांसारख्या अनेक कंपन्यांच्या मंडळातही त्यांचा सहभाग आहे. ते जनरल अटलांटिक या प्रायव्हेट इक्विटी फर्मचे उपाध्यक्षही राहिले आहेत.

भारत सरकारने 2016 मध्ये पद्मश्री दिला:

आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने 2016 मध्ये अजय बंगा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. ते 2 जून 2023 रोजी जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांच्यासमोर अनेक नवी आव्हाने आहेत.

नेस्लेमधून करिअरला सुरुवात:

बंगा यांनी 1981 मध्ये मॅगी निर्माता कंपनी नेस्लेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी या कंपनीत 13 वर्षे घालवली आणि व्यवस्थापन ते विक्री विभागापर्यंत काम केले. भारतात पेप्सिको इंटरनॅशनल रेस्टॉरंट चेन उघडण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.

बंगा यांची एकूण संपत्ती:

अजय बंगा यांची एकूण संपत्ती पाहिली तर त्यांच्याकडे सुमारे 206 दशलक्ष डॉलर (सुमारे 1700 कोटी रुपये) संपत्ती आहे. CNBC ने 2021 मध्ये ही आकडेवारी जाहीर केली. अजय बंगा यांच्याकडे मास्टरकार्ड स्टॉक देखील आहे, ज्याचे मूल्य 11.31 दशलक्ष डॉलर आहे. अंदाजे बंगा यांची रोजची कमाई सुमारे 52 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT