Iran Election esakal
ग्लोबल

Iran Election : इराणमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान; दोन मोठ्या आंदोलनानंतर विद्यमान सरकारचं भवितव्य मतपेटीत बंद

Iran Election News : इराणमध्ये शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान केले. दोन वर्षांपूर्वी सरकारविरोधात झालेल्या प्रचंड मोठ्या आंदोलनानंतर या देशात प्रथमचम मोठी निवडणूक होत असून या निवडणुकीच्या निकालाकडे जगभराचे लक्ष लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Marathi News

तेहरान : इराणमध्ये शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान केले. दोन वर्षांपूर्वी सरकारविरोधात झालेल्या प्रचंड मोठ्या आंदोलनानंतर या देशात प्रथमचम मोठी निवडणूक होत असून या निवडणुकीच्या निकालाकडे जगभराचे लक्ष लागले आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी मतदानाला सुरुवात होताच मतदान केले. १९८१ मध्ये बाँबस्फोटात इजा झालेला त्यांचा हात मतपत्रिका पेटीत टाकताना थरथरत होता. नागरिकांनी शक्य तितक्या लवकरच आणि मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी सकाळी केले.

‘या निवडणुकीकडे आपले मित्र आणि शत्रू अशा दोघांचेही बारीक लक्ष आहे. आपल्या मित्रांना खूश करा आणि इराणच्या वाईटावर असणाऱ्या शत्रूला तोंडघशी पाडा,’ असे आवाहन त्यांनी जनतेला केले. यानंतर दिवसभर इराणमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून मतदान केले. मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. निवडणुकीचा निकाल उद्या (शनिवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे.

इराणच्या संसदेत २९० सदस्य असतात. या जागांसाठी जवळपास १५ हजार उमेदवार रिंगणात आहेत. चार जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव असतात. निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाल चार वर्षांचा असतो. या निवडणुकीत देशाच्या तज्ज्ञसभेवरही नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.

या सभेवर निवड केले जाणारे सर्व सदस्य मुस्लीम धर्मगुरु असतात आणि त्यांचा कार्यकाळ आठ वर्षांचा असतो. खामेनी यांनी राजीनामा दिल्यास अथवा त्यांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या जागी नवा सर्वोच्च नेता निवडण्याचे अधिकार या तज्ज्ञसभेला असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT