Japan Airlines flight  esakal
ग्लोबल

जपान एअरलाइन्सच्या विमानाला धावपट्टीवर भीषण आग, 350 जणांना सुखरूप काढले बाहेर

स्थानिक मीडियाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये जपान एअरलाइन्सचे विमान हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले.

Sandip Kapde

टोकियो: टोकियोच्या हानेदा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. स्थानिक मीडियाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये जपान एअरलाइन्सचे विमान हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. विमानातील 350 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

विमान आणि जपान तटरक्षक दलाच्या विमानात झालेल्या टक्करमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टोकियो अग्निशमन विभागाने ही माहिती दिली. वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले.

विमानाला आग लागली तेव्हा विमानात 350 लोक होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना टळली. सध्या विमानाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

SCROLL FOR NEXT