Masood Azhar News: भारताचा शत्रू मसूद अझहरचा मृत्यू? पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात ठार झाल्याचा दावा

Masood Azhar News: मीडिया रिपोर्ट्सनुसार, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर पहाटे 5 वाजता बहावलपूर मशिदीतून परतत असताना 'अज्ञात व्यक्तींनी' केलेल्या बॉम्बस्फोटात त्याचा मृत्यू झाला आहे.
Masood Azhar News
Masood Azhar NewsEsakal

भारताचा आणखी एक शत्रू आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. अपुष्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर पहाटे 5 वाजता मारला गेला. पाकिस्तानातील बहावलपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

दाऊद इब्राहिमनंतर आता संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. याबाबत सोशल मीडियावर सातत्याने चर्चा सुरू आहे.

Masood Azhar News
Ayodhya Ram Mandir: कोण आहेत शिल्पकार अरुण योगीराज, ज्यांनी घडवलेली मूर्ती अयोध्येतील मंदिरात होणार विराजमान?

अपुष्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर पहाटे 5 वाजता बहावलपूर मशिदीतून परतत असताना 'अज्ञात व्यक्तींनी' केलेल्या बॉम्बस्फोटात ठार झाला. मौलाना मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता.

पाकिस्तानमधील अपुष्ट वृत्तानुसार मोस्ट वाँटेड दहशतवादी, कंदहारचे अपहरणकर्ता, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर बहावलपूर मशिदीतून परतत असताना 'अज्ञात लोकांनी' सकाळी 5 वाजता केलेल्या बॉम्बस्फोटात ठार झाला आहे.

Masood Azhar News
Ram Mandir: राम लल्लाची मूर्ती झाली निश्चित; प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांना मिळाले भाग्य

मसूद अझहर हा संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड

अझहरचा जन्म 10 जुलै 1968 रोजी पाकिस्तानातील पंजाब राज्यातील बहावलपूर येथे झाला. मसूद अझहर हा त्या दहशतवाद्यांपैकी एक होता ज्यांच्या सुटकेची मागणी त्याने कंदाहारला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 (IC814) चे अपहरण केल्यानंतर केली होती. मसूद अझहरने 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कटही रचला होता.

अहवालानुसार, तो इस्लामाबादमधील पाकिस्तानी डीप स्टेटच्या संरक्षणात्मक कोठडीत राहत होता. 55 वर्षीय दहशतवादी बहावलपूरमधील रेल्वे लिंक रोडवर असलेल्या मरकज-ए-उस्मान-ओ-अली या त्याच्या मदरशाला क्वचितच भेट देत असे.

Masood Azhar News
जपानमधील भूकंपात 8 जणांचा मृत्यू; आतापर्यंत बसलेत तब्बल 155 झटके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com