US_Joe_Biden 
ग्लोबल

बायडेन आणि हॅरिस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार साधेपणानेच; वाचा सविस्तर

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुक निकालाप्रमाणेच या पदाची सूत्रे स्वीकारण्याच्या शपथविधी कार्यक्रमाकडेही संपूर्ण जगाचे लक्ष असते. दरवेळी लाखोंच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम यंदा कोरोना संसर्गामुळे मात्र साधेपणाने होणार आहे. पुढील वर्षी २० जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमाला केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असून बाकीच्यांनी घरातूनच टीव्हीवर हा कार्यक्रम पहावा, असे आवाहन कार्यक्रम समितीने जनतेला केले आहे.

अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीसमोर होणाऱ्या या कार्यक्रमाला ११७ व्या संसदेचे सदस्य आणि त्यांच्याबरोबर एक जण, इतक्याच लोकांना प्रवेश असेल. त्यामुळे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या शपथविधसाठी जनतेने प्रवास करून येऊ नये आणि आपल्या घरी बसूनच या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कार्यक्रम समितीने केले आहे.

‘बायडेन-हॅरिस यांच्या सत्ताकाळात अमेरिकेच्या वातावरणात एकतेचे, सर्वसमावेशकतेचे आणि सुरक्षिततेचे वातावरण असेल, हे बिंबविण्याचा आम्ही पहिल्याच दिवशी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठीच सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठीच आणि परंपरेचाही मान राखण्यासाठी आम्ही कार्यक्रमाचे नियोजन केले आहे,’ असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे. दर शपथविधीला, कार्यक्रम समितीकडून सुमारे दोन लाख तिकीटांचे वितरण केले जाते.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT