Joe Biden with Vladimir Putin 
ग्लोबल

बायडेन-पुतीन यांचा फोन कॉल; अमेरिकेने म्हटलं, 'युक्रेनवर हल्ला केल्यास...'

सकाळ डिजिटल टीम

बायडेन आणि पुतिन यांच्यात शनिवारी एक तास फोनवरून चर्चा झाली.

वॉशिंग्टन - रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. रशिया (Russia) कधीही युक्रेनवर हल्ला करू शकतो अशी माहिती गुप्तचर संस्थांनी दिल्यानंतर अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यातील चर्चा थांबवण्यात आली आहे. बायडेन यांनी पुतिन यांना सांगितलं की,'युक्रेनवर (Ukraine) रशियाने हल्ला केल्यास त्याचे परिणाम म्हणून मानवाला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागेल.' बायडेन आणि पुतिन यांच्यात शनिवारी एक तास फोनवरून चर्चा झाली. यावेळी बायडेन यांनी रशियाला थेट इशारा देत सांगितलं की, जर रशियाने हल्ला केला तर त्याच्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.

अमेरिका आणि इतर सहकारी देश रशियाला चोख प्रत्युत्तर देऊ असा इशाराच बायडेन यांनी दिला आहे. तसंच युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेलं सैन्य हटवण्यास रशियाला सांगण्यात आलं. युक्रेनवर हल्ल्यामुळे रशियाची प्रतिमा मलीन होईल. युक्रेनबाबत अमेरिका चर्चा सुरु ठेवेल मात्र इतर परिस्थितीचा सामना करण्यासही तितक्याच ताकदीने तयार असल्याचंही बायडेन यांनी चर्चेवेळी सांगितलं.

बायडेन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानुसार ,'बिजिंमध्ये सुरु असलेलं हिवाळी ऑलिम्पिक २० फेब्रुवारीला संपल्यानतंर काही दिवसात रशिया हल्ला करू शकते.'

युक्रेनवर हल्ल्याची शक्यता या चर्चेला रशियाने आतापर्यंत फेटाळून लावलं आहे. अमेरिकेनं स्पष्ट केलं की, जर्मनी, पोलंड, आर्मेनियात तैनात असलेले अमेरिकन सैनिक रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवण्यात आलेले नाहीत. ते युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध युद्ध लढणार नाहीत. फक्त हल्ल्यापासून नाटो देशाचे संरक्षण करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT