किम जोंग उन 
ग्लोबल

ऐलियन्सने फुग्यांमध्ये भरून कोरोना व्हायरस पृथ्वीवर फेकला; किम जोंग यांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाने आधीच धुमाकूळ घातला आहे. मागीत तीन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त आहे. जगभरात दररोज लाखो नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मात्र कोरोना व्हायरस कसा आणि कुठून आला याबाबत आतापर्यंत ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीविषयी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अजब दावा केला आहे. त्यांच्या दाव्याची चर्चा जगभरात होत आहे. (kim jong claims about corona Virus)

किम जोंग उन यांनी म्हटलं की, जगात कोरोना व्हायरस परग्रहावरील ऐलियन्सने पृथ्वीवर पसरवला आहे. उत्तर कोरियातील पहिला रुग्ण देखील ऐलियन्समुळेच सापडला. किम जोंग यांनी दावा केली की, दक्षिण कोरियाच्या सीमेवरून ऐलियन्सने फुग्यांमध्ये व्हायरस भरून आमच्याकडे फेकला. त्यानंतरच देशात कोरोना व्हायरस पसरला.

दरम्यान उत्तर कोरियात याआधीच एक अफवा पसरलेली आहे. ज्यानुसार एप्रिलमध्ये एका 18 वर्षीय सैनिक आणि पाच वर्षाच्या मुलाने ऐलियन्स सदृश्य व्यक्तीला स्पर्श केला होता. त्यानंतर दोघांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले आणि उत्तर कोरियात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली.

दक्षिण कोरियाने ऐलियन्सचा दावा फेटाळला

उत्तर कोरियाचा शेजारी देश दक्षिण कोरियाने ऐलियन्सने कोरोना पसरविल्याचा दावा फेटाळून लावला हे निर्धार असल्याचं म्हटलं. यावर सियोल विद्यापीठाचे प्रोफेसर यांच्यानुसार किम जोंग यांच्या दाव्यावर म्हटलं की, वस्तूंच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे किम जोंग याच्या दाव्यावर विश्वास ठेवणं कठिण आहे.

उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNA नुसार, सरकारने सीमेला लागून असलेल्या भागांसाठी काही सूचना दिल्या आहेत. यानुसार सीमेजवळ राहणाऱ्या लोकांनी हवेतून येणारे फुगे किंवा एलियन सारख्या गोष्टींपासून सावध राहावे. असा प्रकार कोणाला दिसल्यास पोलिसांना कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT