रिअल लाईफ 'चुचा'! स्वप्नात दिसला नंबर; लॉटरी खरेदी करून जिंकले दोन कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिअल लाईफ 'चुचा'! स्वप्नात दिसला नंबर; लॉटरी खरेदी करून जिंकले दोन कोटी

रिअल लाईफ 'चुचा'! स्वप्नात दिसला नंबर; लॉटरी खरेदी करून जिंकले दोन कोटी

वॉशिंग्टन - काही वर्षांपूर्वी फुकरे (fukrey) नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात चुचा नावाचं एक पात्र होतं. चुचा रात्री एक स्वप्न पाहायला आणि सकाळी त्याच्या मित्राला सांगायचा. त्यानंतर चुचा याचा मित्र स्वप्नाची स्टोरी ऐकून एक नंबर काढायचा. त्यातून ते लॉटरी लावायचे आणि पैसे जिंकायचे. असंच काहीस अमेरिकेतील व्हर्जिनियात घडलं आहे. (Man Wins Lottery Using Numbers He Saw In Dream)

हेही वाचा: Bill Gates Resume : जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचा CV पाहिलाय का?

व्हर्जिनियातील कोलमन नावाच्या व्यक्तीने स्वप्नात दिसलेल्या नंबरवरून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. आश्चर्याची बाब म्हणजे कोलमन यांचा नंबर खरा ठरला आणि त्यांनी 1.97 कोटी रुपये जिंकले.

कोलमन यांनी सांगितलं की, त्यांनी लॉटरीचे तिकीट केवळ दोन डॉलरला विकत घेतले, पण आपल्या तिकीटाचा नंबर येईल असं आपल्याला कधी वाटले नव्हते. जेव्हा लॉटरी अधिकाऱ्याने मला सांगितले, मी लॉटरी जिंकून 1.97 कोटी रुपयांचा मालक झालो, तेव्हा मला विश्वासच बसला नव्हता. कोलमन एक निवृत्त अधिकारी आहे. त्यांना टीव्ही पाहताना लॉटरीची माहिती मिळाली होती. तेव्हाच त्यांनी लॉटरीवर नशीब आजमवायचे ठरवले होते.

हेही वाचा: मोबाईलचा शोध लावणाराच फोन वापरत नाही; म्हणतो…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'व्हर्जिनिया लॉटरी' बुधवार आणि रविवारी ड्रॉ काढते. यामध्ये तीन विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. प्रथम पारितोषिकाची रक्कम 1 दशलक्ष डॉलर, द्वितीय पारितोषिक 5 लाख डॉलर आणि तृतीय पुरस्कार 2.5 लाख डॉलर बक्षीस दिले जाते.

ट्रक ड्रायव्हरने जिंकले 7.5 कोटींची लॉटरी

लॉटरीत अमेरिकेतील सामान्य माणसाने कोट्यवधी रुपये जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, मिशिगनच्या एका ट्रक ड्रायव्हरने लॉटरीमध्ये 7.5 कोटी रुपये जिंकले होते.

Web Title: Man Wins 250000 Dollar In Lottery Using Numbers He Saw In Dream

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..