Kim Jong-un  sakal
ग्लोबल

Kim Jong Un Russia Visit: तासाला ५० किमी धावणाऱ्या बुलेटप्रूफ ट्रेनने किम जोंग उन रशियात; पण का? जाणून घ्या सविस्तर

रोहित कणसे

Kim Jong Un in Russia: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन मंगळवारी (12 सप्टेंबर 2023) रशियाला पोहोचले आहेत. येथे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

किम जोंग उन त्यांच्या आलिशान खाजगी ट्रेनमधून रशियाला पोहोचले असून त्यांच्यासोबत नेते आणि काही लष्करी कमांडर याच्यासोबत आर्म्स इंडिस्ट्रीचे बडे अधिकारी देखील रशियाला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात किम जोंग उन आणि पुतीन यांच्या परस्परांमधील संबंध दृढ करण्यावर भर दिला जाणार असून. याशिवाय अमेरिकेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी दोन्ही देश रणनीती बनवू शकतात.

या मुद्द्यांवर होणार चर्चा

रिपोर्टनुसार, या भेटीदरम्यान पुतिन किम जोंग उन यांच्याकडे रशियन सैन्यासाठी तोफा आणि अँटीटँक मिसाइलची मदत मागू शकता. या बदल्यात किम जोंग उन पुतिन यांच्याकडून अडव्हांस सॅटेलाइट आणि अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी तंत्रज्ञानाची मागणी करतील. याशिवाय किम जोंग उन रशियाकडून अन्न मदतीची मागणी करणण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर कोरियाच्या काही भागात उपासमारीची परिस्थिती असल्याचा दावा अनेक रिपोर्टमधून करण्यात आला आहे. याशिवाय इतर अनेक संवेदनशील विषयांवरही दोन्ही नेते चर्चा करणार आहेत.

विमानाऐवजी ट्रेनने प्रवास का?

किम जोंग उनचा ट्रेनने रशियाला पोहोचल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की किम जोंग उन विमानाने प्रवास करण्याऐवजी ट्रेनने प्रवास का पसंत करतात? न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, किम जोंग उनचे वडील किम जोंग इल आणि आजोबा किम इल सुंग हे दोघेही विमान प्रवास करण्यास घाबरत होते. किम जोंग इल आणि किम इल सुंग यांनी विमान प्रवासादरम्यान त्यांच्या जेटमध्ये स्फोट झाल्याचे पाहिले तेव्हांपासून ही भीती उद्भवल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर किम इल सुंग यांनी 1986 मध्ये एकदा सोव्हिएत युनियनला भेट दिली होती. तीन दशकांहून अधिक काळात उत्तर कोरियाच्या नेत्याने विमानाने परदेशात जाण्याची ही शेवटची वेळ होती.

किम जोंग उन स्वित्झर्लंडमधील बोर्डिंग स्कूलच्या दिवसांमध्ये अनेक वेळा विमान प्रवास केला आहे. पण 2011 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर विमानाने प्रवास करणे जवळपास बंद केले. 2018 मध्ये शेवटच्या वेळी ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी विमानाने सिंगापूरला गेले होते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ट्रेनने प्रवास करण्यामागील कारण हे कुटुंबाची परंपरा पाळणे असू शकते.

ट्रेनमध्ये सुरक्षेकडे विशेष लक्ष

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, किम जोंग उन प्रवास करत असलेली ट्रेन तीच आहे जी त्यांचे वडील आणि आजोबा वापरत होते. त्यात आलिशान सोफे आणि कॉन्फरन्स रूमची व्यवस्था आहे. ट्रेनमध्ये 21 बुलेटप्रूफ कॅरेज आहेत. त्याच्या ताफ्यात दोन गाड्या धावतात. संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी सुमारे 100 सुरक्षा एजंट स्टेशनवर पुढे पाठवले जाते, तर इतर गाड्या पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी स्थानकांवर वीज बंद केली जाते.

ट्रेनचा वेग किती?

सुरक्षेच्या दृष्टीने ही ट्रेन खूप मजबूत असली तरी वेगाच्या बाबतीत ती बाइकपेक्षा कमी आहे. त्याचा वेग 50 किमी/तास (31 मैल प्रतितास) आहे, जो आधुनिक गाड्यांपेक्षा खूपच कमी आहे. मजबुतीच्या बाबतीत, या ट्रेनची तुलना लंडनच्या हाय-स्पीड रेल्वेशी जी सुमारे 200 किमी/तास आणि 320 किमी/तास वेगाने धावणारी जपानची शिंकनसेन बुलेट ट्रेनशी केली जाते. तसेच ही ट्रेन अनेक सुविधांनी सुसज्ज करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT