Jamy Mackdonald_Man Visits All 7 Wonders Of The World In Just 7 Days Sets New Guinness World Record 
ग्लोबल

Jamie McDonald: पठ्ठ्यानं जॅकी चेनलाही टाकलं मागे! सात दिवसांत पाहिली जगातील 7 आश्चर्ये

जाणून घ्या या ध्येयवेड्याचा प्रवास, यामागची त्याची प्रेरणा अन् जॅकी चेनचा 'तो' सिनेमा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : माणसाला जीवन एकदाच मिळतं आणि ते कोणत्याही अटीशर्तींवर न जगता त्याचा मनमुराद आनंद घेणारे अनेक जण असतात, या लोकांचं तत्वज्ञानचं असतं हे. याचसाठी ते जगभ्रमंतीही करतात. पण अशा गोष्टी करताना ते अशा काही अचाट गोष्टी करतात जो विक्रम ठरते आणि त्याची दखल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसारख्यांनाही घ्यावी लागते.

असाच एक अवलिया आहे, जॅमी मॅक्डोनल्ड ज्यानं जगातील सात आश्चर्ये प्रत्यक्ष पाहिली ती ही केवळ सात दिवसांत. चीनपासून अमेरिकेपर्यंतची ही सात ठिकाणं त्यानं केवळ एका आठवड्यातच पाहिली. ही कामगिरी त्यानं कशी केली, हेच आपण या बातमीतून पाहणार आहोत. (Man Visits All 7 Wonders Of The World In Just 7 Days Sets New Guinness World Record)

जॅमी मॅक्डोनल्ड हा ब्रिटिश नागरिक असून तो ऑनलाईन विश्वास 'अॅडव्हेंचर मॅन' म्हणून ओळखला जातो. त्यानं एक नवी साहसी मोहिम करण्याचं निश्चित केलं, त्यानुसार जगातील सात आश्चर्चे केवळ सात दिवसांत पहायची असा त्यानं पण केला.

त्यानुसार, मग त्यानं 'ग्रेट वॉल ऑफ चायना', 'ताज महाल', 'पेट्रा', 'दि कोलेसम', 'क्राईस्ट द रेडिमर', 'माचू-पिचू', 'चिचेन इत्झा एल कॅस्टिलो' या ७ ठिकाणांना फक्त ७ दिवसांत भेट देण्याचं निश्चित केलं. त्यानुसार, त्यानं सहा दिवस १६ तास १४ मिनिटांत आपली ही मोहिम फत्ते केली.

जगातील सात आश्चर्यांना भेटी देण्याच्या आपल्या या प्रवासात जॅमी मॅकडोनल्डनं १३ विमानं, १६ टॅक्सी, ९ बसेस, ४ ट्रेन्स आणि १ टोबोगन या वाहनांचा वापर केला. यासर्व वाहनांमधून त्याचा ४ खंडांमधून तब्बल ३६,७८० किमीचा प्रवास झाला.

यामध्ये त्याचं पहिलं भेटीचं ठिकाण होतं चीनमधील ग्रेट वॉल ऑफ चायना, त्यानंतर भारतातील ताज महालला त्यानं भेट दिली. भारतभेटीनंतर त्यानं जॉर्डनसाठी विमान पकडलं, त्यानंतर त्यानं तिथून पेट्रापर्यंत बसनं प्रवास केला. त्यानंतरचा त्याचा पुढचा थांबा रोम होता.

या ठिकाणी त्यानं कोलोसम पाहिलं. त्यानंतर त्यानं दुसरा विमान प्रवास करत तो ब्राझिलला पोहोचला. या ठिकाणी त्यानं जगातील सर्वात मोठं क्रिस्ट द रेडिमर हा पुतळा पाहिला. त्यानंतर तो माचू-पिचूला गेला त्याचा हा प्रवास ट्रॅव्हलपोर्ट कंपनीनं स्पॉन्सर केला होता.

मॅकडोनाल्ड याची ही मोहिम केवळ जागतीक विक्रम करण्यासाठी नव्हती तर सुपरहिरो फाऊंडेशन या चॅऱिटीसाठी पैसा उभा करण्याचा या मोहिमेचा हेतू होता. नऊ वर्षांपासून सिरिंगोमिलिया नावाच्या मणक्याच्या दुर्मिळ आजारानं तो ग्रस्त होता. या काळात त्याला ज्या रुग्णांनी साथ दिली त्यांच्यासाठी त्याला विशेष काहीतरी करायचं म्हणून 2012 मध्ये, मॅकडोनाल्डनं मोठी आव्हानं स्वीकारून रुग्णालयांसाठी निधी उभारण्यास सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT