hafiz saeed
hafiz saeed 
ग्लोबल

दहशतवाद्यांच्या यादीतून माझे नाव काढा : हाफिज सईद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'जमात-उद-दावा'चा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदची पाकिस्तानच्या नजरकैदतून नुकतीच सुटका करण्यात आली. त्यानंतर आता त्याने जागतिक दहशतवाद्यांच्या यादीतून नावे काढावे, अशी विनंती संयुक्त राष्ट्रसंघाला केली आहे. याबाबत त्याने याचिकाही दाखल केली आहे.

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे हाफिज सईदला दहशतवादी घोषित करावे, अशी शिफारस अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघाकडे केली होती. अमेरिकेच्या या शिफारशीची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने 2008 साली हाफिजला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. 

गेल्या काही महिन्यांपासून हाफिज सईद पाकिस्तान सरकारच्या नजरकैदेत होता. पाकिस्तानच्या न्यायालयाने त्याची काही दिवसांपूर्वी सुटका केली. त्याच्या या सुटकेनंतर भारतासह इतर काही देशांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता त्याने आपले नाव दहशतवाद्यांच्या यादीतून काढून टाकावे, अशी याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, हाफिजच्या या याचिकेवर संयुक्त राष्ट्रसंघ यावर काय निर्णय देते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Constituency Lok Sabha Election Result: कोल्हापुरात जल्लोष सुरु... शाहू महाराज जवळपास फिक्स? संजय मंडलिकांची केली अडचण

India Lok Sabha Election Results Live : भाजप 300 जागांवर पुढे! मग राहुल गांधींची इंडिया आघाडी आहे तरी कुठे?

Raj Thackeray: राज ठाकरेंचा करिष्मा चालला; जिथे सभा, तिथे महायुतीचे उमेदवार आघाडीवर!

Baramati Lok Sabha : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे मोठ्या आघाडीवर, २६ हजार मतांचा फरक

Lok Sabha Election 2024: कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा पराभूत! मतदारांनी दिला दणका

SCROLL FOR NEXT