मेलबर्न - व्हिक्टोरिया प्रांतात लॉकडाउन लागू होताच नागरिकांनी सहकार्य केले. त्यामुळे कारणाशिवाय कुणीही बाहेर पडत नव्हते. 
ग्लोबल

मेलबर्न, ऑकलंडचे लॉकडाउन आज संपणार

यूएनआय

मेलबर्न/ऑकलंड - ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि न्यूझीलंडमधील ऑकलंड या दोन शहरांमधील लॉकडाउन गुरुवारी संपुष्टात येईल. मेलबर्नला पाच, तर ऑकलंडला तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले. 

व्हिक्‍टोरिया प्रांतातील मेलबर्नमध्ये नागरिकांना व्यायाम, खरेदी, नोकरी आणि गरजू व्यक्तींची देखभाल इतक्‍याच कारणांसाठी बाहेर पडण्याची परवानगी होती. हॉटेलमधील क्वारंटाईन केंद्रावरील संसर्गावर नियंत्रण मिळविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथे १९ रुग्ण आढळले होते. तेथील एका व्यक्तीला ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या प्रकाराचा संसर्ग झाला, जो सुरवातीला लक्षात आला नाही. त्यामुळे सामुहिक संसर्ग पसरला होता. बुधवारी नवे रुग्ण आढळले नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारवर दडपण
ही व्यक्ती हॉटेलमधील क्वारंटाईन केंद्रात असूनही त्याच्यामुळे संसर्ग कसा पसरला याचे स्पष्टीकरण देण्यासाठी व्हिक्टोरिया प्रांताच्या अधिकाऱ्यांवर दडपण आले आहे. अलीकडच्या काही महिन्यांत निर्बंधांचे उल्लंघन झाल्यामुळे अशा घटना घडल्या आहेत. व्हिक्टोरिया हा ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येचा दुसरा प्रांत आहे. तेथे २८ दिवस एकही रुग्ण आढळला नव्हता.

दरम्यान, ऑकलंडमध्ये केवळ तीन स्थानिक रुग्ण आढळल्यामुळे लॉकडाउन लागू करण्यात आले होते. ब्रिटनमधील जास्त वेगाने संसर्ग पसरविणारा प्रकार आढळल्यामुळे सहा महिन्यांच्या खंडानंतर प्रथमच लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांनी घेतला होता.

कडक उपाययोजना
कोरोनाच्या जागतिक साथीत दोन देशांचे धोरण चर्चेचा विषय ठरले. तेथे कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या. त्यामुळे रुग्ण तसेच मृतांची संख्या तुलनेने कमी राहिली आहे.

विषाणूच्या संसर्गाचे चक्र भेदण्यासाठी कमी कालावधीचे मात्र तीव्र निर्बंधांचे लॉकडाउन लागू करण्याचे आम्ही समर्थन करतो. स्थानिक पातळीवर संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता त्यामुळे कमी झाली. मिळालेल्या सल्ल्यानुसार आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. व्हिक्टोरियातील प्रत्येक नागरिकांचा मला अभिमान वाटतो. त्यांचे केलेले प्रयत्न आणि त्यात मोलाचा आहे. 
- डॅनिएल अँड्रयूज, व्हिक्टोरीयाचे प्रांतपाल

अत्यंत दक्षतेच्या धोरणाचा अवलंब करण्यावर आमचा कटाक्ष होता. याचे कारण निर्णय चुकू नये, त्यातून सामुहिक संसर्गाचा धोका निर्माण होऊन जास्त दिवसांसाठी लॉकडाउन लागू करावे लागू नये असा आमचा उद्देश होता.
- जेसिंडा अर्डेर्न, न्यूझीलंडच्या पंतप्रधान

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT