Alfredo_Aylin 
ग्लोबल

आईनं जुळ्यांना दिला जन्म, पण दोन भिन्न वर्षात असणार वाढदिवस

केवळ पंधरा मिनिटांच्या फरकानं या बहिण-भावाचा जन्म झाला

Amit Ujagare (अमित उजागरे)

कॅलिफोर्निया : अमेरिकेत (USA) एका महिलेन जुळ्यांना जन्म दिला केवळ पंधरा मिनिटांच्या फरकानं त्यांचा दोन वेगळ्या दिवसांना आणि वर्षामध्ये जन्म झाला. ही जुळी २० लाख बालकांमध्ये एकमेव ठरली आहेत. कॅलिफोर्नियातील (California) एका रुग्णालयात ही घटना घडली. (Mother gave birth to twins but birthdays will be in two different years)

फातिमा माद्रिगल असं या महिलेचं नाव असून तिच्या अल्फ्रेड नावाच्या मुलाचा जन्म ३१ डिसेंबर २०२१ च्या रात्री ११.४५ मिनिटांनी झाला तर आयलिन नावाच्या मुलीचा जन्म अल्फ्रेडच्या जन्मानंतर पंधरा मिनिटांनी म्हणजेच मध्यरात्री १२ वाजता म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी झाला. नातिविदाद मेडिकल सेंटरमधील डॉक्टरांनी या जुळ्या भावंडांचा फोटो शेअर करत म्हटलं की, अमेरिकेत दरवर्षी १,२०,००० मुलांचा जन्म होतो. पण जुळी भावंड ती देखील दोन वेगळ्या दिवशी जन्माला येणं ही खूपच दुर्मिळ घटना असते. अशा घटना या एक किंवा दोन मिलियन मुलांच्या जन्मापैकी एखादीच असते.

फातिमा माद्रिगल आणि रॉबर्ट ट्रुजिलो या जोडप्याला आधीच तीन मुलं आहेत. यांपैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यात आता ही जुळी मुलं झाली आहेत. या जुळ्या भावंडांमध्ये एक मुलगा तर एक मुलगी आहे.

यापूर्वी, अशाच प्रकारे ३१ डिसेंबर २०१९ एक दुर्मिळ डिलिव्हरी झाली होती. यामध्ये डॉन गिलिअम या महिलेनं जुळ्यांना जन्म दिला होता. यांपैकी एकाच जन्म ३१ डिसेंबर रोजी ११.३७ तर दुसऱ्या बाळाचा जन्म १ जानेवारी २०२० रोजी मध्यरात्री १२.०७ वाजता झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कश्यपी धरणात चौघांना जलसमाधी! पतीसह गर्भवती पत्नी अन् शेजाऱ्यांची दोन मुले बुडाली; २ वर्षाच्या बाळामुळे घटना समजली

अक्षय कुमारचा नवा एलियन थरार! नव्या सिनेमाची केली घोषणा

Mahavitaran Electricity Cut : महावितरणचा शेतकऱ्यांना तगडा झटका, शेतीसाठी आता फक्त सहा तास वीज; २ तास कपातीचा निर्णय

Sports: भारतीय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकतेचा नारा; वाद व कायदेशीर नोंदीसाठी स्वतंत्र पोर्टलचा श्रीगणेशा

Viral Video: मंत्र्याने दोन सापांना हाताने पकडलं; दंश झाला तरी चेहऱ्यावर हसू, VIDEO पाहून जग हादरलं!

SCROLL FOR NEXT