आँग सान स्यू की 
ग्लोबल

म्यानमार : आंग सान स्यू की यांना 5 वर्षांची शिक्षा

स्यू की यांना रोख 600,000 डॉलर आणि सोन्याची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : म्यानमारच्या (Myanmar) न्यायालयाने बुधवारी पदच्युत नेत्या आंग सान स्यू की (Aung San Suu Kyi) यांना भ्रष्टाचारप्रकरणी (Corruption) दोषी ठरवले असून, भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की यांना रोख 600,000 डॉलर आणि सोन्याची लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. (Aung San Suu Kyi News)

दरम्यान, लष्करशासित म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात पदच्युत नेत्या आंग सान स्यू की यांच्यावर भ्रष्टाचाराचे नवीन आरोप दाखल केले असून, या सर्व आरोपांमध्ये दोषी आढळल्यास आंग सान स्यू की यांना 100 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवास भोगावा लागू शकतो असे वृत्त क्योडो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीच्या सत्तापालटानंतर अशांततेचे वातावरण असून, म्यानमारच्या लष्कराने वरिष्ठ जनरल मिंग आंग हुलिंग यांच्या नेतृत्वाखालील आंग सान सू ची यांचे सरकार हटवून एक वर्षाची आणीबाणी जाहीर केली होती. यादरम्यान येथे नागरिकांना अनेक हिंसक घटनांनाही सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT