रशिया युक्रेन युद्ध संपणार?; पुतिन यांची नरमाईची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Vladimir Putin
रशिया युक्रेन युद्ध संपणार?; पुतिन यांची नरमाईची भूमिका

रशिया युक्रेन युद्ध संपणार?; पुतिन यांची नरमाईची भूमिका

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र हे युद्ध कधी संपणार, हिंसाचार कधी थांबणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. याचविषयीचे संकेत आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिले आहे.

रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी आम्ही अजूनही चर्चेसाठी तयार आहोत. पुतिन यांनी संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष अँटोनिओ गुटेरस यांना सांगितलं की, सध्या युक्रेनमध्ये लष्करी कारवाई जरी सुरू असली तरी आम्ही अजूनही आशा करतो की आम्ही काहीतरी मधला मार्ग काढू शकू. आम्ही चर्चा करत आहोत, आम्ही चर्चेला नकार दिलेला नाही.

गुटेरस सध्या हा संघर्ष संपवण्यासाठी मध्यस्थी करत आहेत. ते सध्या मॉस्को दौऱ्यावर आहेत. युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. ते पुढे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडेमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यासाठी क्यीवलाही जाणार आहेत.