kim jong un 
ग्लोबल

तब्बल एका वर्षानंतर दिसून आली किम जोंग उनची बायको; गर्भवती असल्याची चर्चा

सकाळवृत्तसेवा

प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची पत्नी री सोल जू या एका वर्षानंतर पहिल्यांदाच बुधवारी जाहीररित्या मीडियासमोर दिसल्या. त्या आपल्या पतीसोबत एका कॉन्सर्टमध्ये दिसून आल्या. उत्तर कोरियाच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या वर्तमान पत्रात रोदोंग सिनमुन यांनी किम जोंग उन आणि त्यांच्या पत्नीचे काही फोटोग्राफ्स प्रकाशित केली आहे. किम जोंग उन यांचे दिवंगत वडील आणि उत्तर कोरियाचे माजी सत्ताधीश किम जोंग इल यांच्या जयंतीनिमित्ताने या कॉन्सर्टचे आयोजन केलं गेलं होतं. किम जोंग उन यांची पत्नी री सोल जू नेहमी आपल्या पतीसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून येतात. मात्र गेल्या वर्षी जानेवारीपासून त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसून आल्या नाहीत. 

त्यामुळे त्या गर्भवती असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गर्भवती असल्याची ही बातमी चुकीची आहे. तसेच या अफवेबद्दल रोष व्यक्त केला आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने मंगळवारी सांगितलं की री सोल जू यांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी येणं टाळलं होतं. तसेच त्या आपल्या मुलांसोबत खेळायच्या. त्या एक वर्षांपासून कुठे दिसून न आल्यामुळे त्यांच्या गर्भवती असण्याबाबतचे कयास लावले जात होते. किंवा त्या आजारी असल्याचीही अफवा पसरली होती. मात्र, आता या स्पष्टीकरणानंतर या अफवांना सडेतोड उत्तर मिळालं आहे.  दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं सांगितलं की री सोल जू आणि किम जोंग उन यांना तीन मुले आहेत. मात्र किम यांच्या तिन्ही मुलांबाबत खूप कमी माहिती सार्वजनिक आहे. शिवाय, त्यांचे फोटो देखील कुठेच जाहीर केले गेले नाहीयेत. उत्तर कोरियामध्ये आतापर्यंत एकादेखील कोरोना प्रादुर्भावाचा रुग्ण आढळला नसल्याचं म्हटलंय. मात्र दक्षिण कोरियाई एजन्सीचं म्हणणं आहे की, कोरोना असल्याच्या दाव्याला नाकारता येत नाही. 

कारण चीन आणि उत्तर कोरियाचे जवळचे संबंध आहेत. मात्र, उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील कॉन्सर्टमध्ये री सोल जू आणि किम जोंग उन हसताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये कुणीही मास्क लावला नाहीये. तसेच कुणीदेखील कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीये. किम जोंग उन यांच्या वडिलांचा जयंती समारोह मोठ्या उत्साहात देशात साजरा केला जातोय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT