satelite esakal
ग्लोबल

आता चीन पाकिस्तानला अंतराळ मोहिमेतही करणार मदत, उपग्रह पाठवणार

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानला (pakistan) व्यापारापासून ते शस्त्रास्त्रांपर्यंत मदत करणारा चीन (china) आता त्याच्यासोबत अंतराळ मोहीमेतही (space mission) मदत करणार आहे. इस्लामाबादच्या (islamabad) सहकार्याने ते अंतराळ कार्यक्रम (satellites program) पुढे नेणार असल्याचे चीनच्या वतीने सांगण्यात आले आहे. पाकिस्तानसाठी स्पेस स्टेशन बांधण्यापासून ते अधिकाधिक उपग्रह सोडणार असल्याची घोषणा चीनने शुक्रवारी केली.

चीनचा स्पेस प्रोग्रॅम 2021 काय आहे?

चीनच्या स्पेस प्रोग्रॅम 2021 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेत पाकिस्तानचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, चीन पाकिस्तानसाठी उपग्रह विकसित करणे आणि स्पेस स्टेशन बांधणीसाठी सहकार्य करणार आहे. याशिवाय येत्या पाच वर्षांत काम आणखी वाढवणार आहेत. चीन स्वतःचे स्पेस स्टेशन बनवत आहे, जे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चीनने चंद्र आणि मंगळावरील आपली मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

चीनकडून प्रक्षेपणात अनेक देशांना मदत

पाकिस्तानला यापूर्वी चीनने अनेक देशांना उपग्रह प्रक्षेपणात मदत केली आहे. चीनची उपग्रह निर्माण करण्यासाठी किंवा प्रक्षेपित करण्याची सेवा आतापर्यंत सौदी अरेबिया, पाकिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा या देशांना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT