Imran Khan esakal
ग्लोबल

Imran Khan : इम्रान सर्वात मोठा शत्रू, एकतर तो मारला जाईल किंवा आम्ही त्याला..; मंत्र्याचं धक्कादायक विधान

पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारमध्ये गृहमंत्री राणा सनाउल्लाह हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे (N) ज्येष्ठ नेते आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंजाबच्या वजीराबादमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी राणा सनाउल्लाह यांचं नाव घेतलं होतं.

Pakistan Politics : सध्या पाकिस्तान केवळ आर्थिकच नाही, तर राजकीय संकटाचाही सामना करत आहे. इम्रान खान यांनी सरकारवर सातत्यानं निशाणा साधल्यानंतर शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या मंत्र्यानं एक धक्कादायक विधान केलंय.

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह (Rana Sanaullah) यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सत्ताधारी पक्षाचा शत्रू म्हटलंय. इम्रान यांनी देशाचं राजकारण अशा वळणावर नेलंय की, एकतर ते (इमरान) मारले जातील किंवा आम्ही मारले जाऊ, असं ते म्हणालेत.

पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारमध्ये गृहमंत्री राणा सनाउल्लाह हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे (N) ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय, ते माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांच्या जवळचे मानले जातात. इम्रान खान यांच्यावरील टिकेनंतर पाकिस्तानातील राजकारण चांगलंच तापलंय. यामुळं इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) मध्ये भीती पसरलीये.

खासगी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सनाउल्लाह म्हणाले, 'एकतर इम्रान खान मारले जातील किंवा आम्ही मारले जाऊ. त्यांनी देशाचं राजकारण अशा वळणावर नेलंय, जिथं पीटीआय किंवा पीएमएलएन या दोघांपैकी एकच उरतो. पीएमएलएनचं संपूर्ण अस्तित्व धोक्यात आलंय. आपण त्यांच्या विरोधात कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो. खान यांनी राजकारणाचं शत्रुत्वात रूपांतर केलंय. खान आता आपला शत्रू आहे आणि त्याच्याशी असंच वागलं जाईल, असाही इशाराही त्यांनी दिला.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंजाबच्या वजीराबादमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी राणा सनाउल्लाह यांचं नाव घेतलं होतं. आपल्या हत्येच्या कटामागं राणा सनाउल्ला यांचा हात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT