Congress : आम्हाला 'परिवारवादी' म्हणता, मग प्रभू राम कोण होते? प्रियंका गांधींचा भाजपला थेट सवाल

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी परिवारवादाच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Priyanka Gandhi News
Priyanka Gandhi Newsesakal
Summary

'माझे वडील देशासाठी शहीद झाले. त्या हुतात्म्याचा देशाच्या संसदेत अपमान होतो. त्या हुतात्माच्या मुलाला तुम्ही देशद्रोही म्हणता.'

Priyanka Gandhi News : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी परिवारवादाच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपल्या कुटुंबावरील आरोपांना प्रत्युत्तर देताना प्रियंका गांधींनी भाजपला सवाल केलेत.

जर तुम्ही आम्हाला परिवारवादी म्हणत असाल तर प्रभू राम कोण होते? त्यांनी आपल्या कुटुंबाप्रती आपला धर्म पाळला, मग ते परिवारवादी होते का? पांडव त्यांच्या कौटुंबिक मूल्यांसाठी लढले म्हणून ते कुटुंबवादी होते का? असे सवाल प्रियंका गांधींनी केले आहेत.

आमच्या कुटुंबीयांनी देशासाठी प्राण दिले, त्याची आम्हाला लाज का वाटावी? माझ्या कुटुंबातील लोकांनी आपल्या रक्तानं या देशाला समृध्द बनवलंय. राजघाटावर काँग्रेसच्या संकल्प सत्याग्रहाला पोहोचलेल्या प्रियांका गांधींनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Priyanka Gandhi News
LokSabha Election : राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर वायनाड जागेची काय स्थिती, कधी होणार पोटनिवडणूक?

त्या पुढं म्हणाल्या, 'तुम्ही आम्हाला कुटुंबवादी म्हणता. मग, भगवान राम कोण होते? त्यांना वनवासात पाठवण्यात आलं. त्यांनी आपला धर्म आपल्या कुटुंबासाठी पाळला. मग, प्रभू राम परिवारवादी होते का? पांडव कुटुंबवादी होते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Priyanka Gandhi News
Mann Ki Baat Episode : 'अवयव दान' हा एखाद्याला जीवन देण्याचा उत्तम मार्ग आहे - PM मोदी

आमच्या कुटुंबातील सदस्य या देशासाठी शहीद झाले, याची आम्हाला का लाज वाटावी. त्याचं रक्त या पृथ्वीतलावर आहे. माझ्या कुटुंबानं रक्तानं या देशातील लोकशाहीचं सिंचन केलंय. माझ्या शहीद वडिलांचा संसदेत अपमान केला. हुतात्माच्या मुलाला 'मीर जाफर' असं संबोधलं गेलं. भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात की, राहुल गांधींना त्यांचे वडील कोण हे देखील माहित नाही? पंतप्रधानांनी संसदेत नेहरू आडनावावर प्रश्न उपस्थित केला? तुमच्यावर कोणताही खटला नाही, तुमचं सदस्यत्व रद्द झालेलं नाही, असंही प्रियंका गांधींनी परखड भाष्य केलं.

प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझे वडील देशासाठी शहीद झाले. त्या हुतात्म्याचा देशाच्या संसदेत अपमान होतो. त्या हुतात्माच्या मुलाला तुम्ही देशद्रोही म्हणता. तुमच्या मंत्र्यांनी संसदेत माझ्या आईचा अपमान केला.' यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'राहुल गांधी या देशातील लोकांसाठी, तुमच्यासाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी लढत आहेत. त्यांचा बेरोजगारी आणि महागाई विरुद्ध लढा सुरु आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com