Pakistan News  esakal
ग्लोबल

Pakistan News : कराचीतल्या रस्त्यांवर ४ लाख प्रोफेशनल भिकारी; मॉल्स, मार्केट अन् ट्रॅफिक सिग्नल्सना घेरा

सध्या पाकिस्तान तेल आणि खाण्या-पिण्यासाठी मोताद झालेलं आहे. महागाईने उच्चांक गाठलेला असून त्यात हे नवीनच संकट लोकांपुढे उभं राहिलं आहे. धड सुखाने बाहेर फिरणंही मुश्कील झालेलं आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः पाकिस्तानमध्ये एकीकडे ईदमुळे बाजार फुललेले आहेत तर दुसरीकडे घराबाहेर पडलेल्या लोकांना अडचणींचा समाना करावा लागतोय. पाकची आर्थिक राजधानी कराचीमध्ये हजारो भिकाऱ्यांनी डेरा टाकला आहे.

लाखोंच्या संख्येने आलेल्या भिकाऱ्यांनी शहराच्या प्रत्येक गजबजलेल्या ठिकाणी घेराव घातल्याचं चित्र आहे. मुख्य रस्ते, बाजारपेठा, ट्रॅफिक सिग्नल्स, शॉपिंग मॉल आणि मशिदींच्या बाहेर भिकाऱ्यांनी लोकांना अडवून पैसे मागणं सुरु केलंय.

सध्या पाकिस्तान तेल आणि खाण्या-पिण्यासाठी मोताद झालेलं आहे. महागाईने उच्चांक गाठलेला असून त्यात हे नवीनच संकट लोकांपुढे उभं राहिलं आहे. धड सुखाने बाहेर फिरणंही मुश्कील झालेलं आहे.

द न्यूज इंटरनॅशनल या वृत्तपत्राने कराचीचे अतिरिक्त महानिरीक्षक इम्रान याकूब मिन्हास यांच्या हवाल्याने म्हटलं की, साधारण तीन ते चार लाख सराईत भिकारी ईदच्या पार्श्वभूमीवर कराचीसारख्या महानगरांमध्ये आलेले आहेत.

मिन्हास पुढे म्हणाले, भिकारी आणि आरोपी प्रकारातील लोक कराचीला एक प्रमुख बाजारपेठेचं शहर समजतात. हे भिकारी सिंध, बलुचिस्तान आणि देशातील इतर ठिकाणांहून कराचीत येतात. परंतु आम्ही पारंपारिक पद्धतीने आरोपींचा तपास लावू शकत नाहीत. त्यामुळे कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sikkim Tunnel Collapse : सिक्कीममध्ये बोगद्यात भूस्खलन २२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू; पोलिस अधिक्षकांनी दिली माहिती

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार सुरूच, लोकल सेवेवर परिणाम; पालघरमध्ये पूरस्थिती, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Latest Marathi Update : 'चलो संसद' आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके आजही बंद; कडक सुरक्षा व्यवस्था

IPL परकीय चलन प्रकरणात ललित मोदींना १६ वर्षांनंतर आफ्रिकेतील न्यायालयाचा दिलासा; ईडीचा दंड रद्द

Chandrashekhar Bawankule : 'काँग्रेसच्या सत्ताकाळात तब्बल 28 वेळा पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या पाठीमागं राहून राजकारण केलं जातंय'; बावनकुळे यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT