Rajshri Deshpande: "ते आळशी लोक आहेत"; वेब सीरिजमधील इंटिमेट सीन्सबाबत काय म्हणाली 'सेक्रेड गेम्स' फेम राजश्री देशपांडे?

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजश्रीनं वेब सीरिजमधील बोल्ड सीन्सबद्दल सांगितलं आहे.
इंटिमेट सीन्सबाबत काय म्हणाली  'सेक्रेड गेम्स'फेम राजश्री देशपांडे?
Rajshri Deshpandeeskal

Rajshri Deshpande: नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमुळे अभिनेत्री राजश्री देशपांडेला (Rajshri Deshpande) विशेष लोकप्रियता मिळाली. राजश्री देशपांडेनं अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. पण 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्ये तिनं साकारलेली सुभद्रा या भूमिकेची बरीच चर्चा झाली. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये राजश्रीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजश्रीनं वेब सीरिजमधील बोल्ड सीन्सबद्दल सांगितलं आहे.

नुकतीच राधिकानं 'आरपार' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. अभिनेत्री मुग्धा गोडबोलेनं (Mugdha Godbole) राधिकाची मुलाखत घेतली. यावेळी राधिकानं वेब सीरिजमधील बोल्ड सीन्सवर भाष्य केलं आहे.

मुलाखतीमध्ये मुग्धा गोडबोलेनं राधिकाला प्रश्न विचारला, "आता असं झालंय की, वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स दाखवावेच लागतात. ओटीटीवर सेन्सॉरशिप नसल्यामुळे इंटिमेट सीन्स असलेच पाहिजेत असं अनिवार्य झालं आहे. त्यामुळे ओटीटीवरचा बराच कंटेट आपण घरात बसून तीन पिढ्यांबरोबर एकत्र नाही बघू शकत नाही"

काय म्हणाली राधिका?

मुग्धाच्या प्रश्नाचं राधिकानं उत्तर दिलं, "असं नाहीये, मला वाटतं की इंटिमेट सीन्स टाकावेच लागतात, असं समजणारे लोक आळशी आहेत. एखाद्याने जर स्क्रिप्टबद्दल विचार केला, तर त्या सीनची काय गरज आहे? तो सीन का आहे? त्याचा काय उद्देश आहे? याचं स्पष्टीकरण ते देऊ शकतात. पण तुम्ही ते फक्त sensationalization करण्यासाठी किंवा क्रॉन्ट्रोवर्सी तयार करण्यासाठी करत असाल तर मग तुम्ही काम न करता शॉर्टकट शोधत आहात."

इंटिमेट सीन्सबाबत काय म्हणाली  'सेक्रेड गेम्स'फेम राजश्री देशपांडे?
Rajshri Deshpande: 'सेक्रेड गेम्स'नंतर मला 'तसले'च रोल होतात ऑफर!

राजश्री देशपांडेनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

राजश्री ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 'तलाश' या चित्रपटाच्या माध्यमातून राजश्रीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं कुछ तो लोग कहेंगे या मालिकेत काम केलं. त्यानंतर तिनं किक,मंटो, मन कस्तुरी रे या चित्रपटांमध्ये देखील काम केलं. राजश्रीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

इंटिमेट सीन्सबाबत काय म्हणाली  'सेक्रेड गेम्स'फेम राजश्री देशपांडे?
Rajshri Deshpande : 'नवाझुद्दीन सोबत तो सीन केला अन् मला....' 'सेक्रेड गेम्स' च्या राजश्री देशपांडेनं सांगून टाकलं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com