Pm Modi AFP
ग्लोबल

UNGA मध्ये जगातील नेत्यांपैकी मोदींची सर्वाधिक प्रतीक्षा - तिरूमूर्ती

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलणार आहेत. १४ सप्टेंबरपासून आमसभेच्या ७६ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी म्हटलं की, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पंतप्रधान मोदींची सर्वाधिक प्रतीक्षा आहे. मोदींनी नेहमीच असे मुद्दे उपस्थित केले जे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. तसंच जगासह भारतासाठीही ते महत्वाचे आहेत. पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलणार आहेत. १४ सप्टेंबरपासून आमसभेच्या ७६ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे.

तिरुमूर्ती म्हणाले की, अमेरिकेत कोरोनाची परिस्थिती सुधारली आहे. लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने आमसभेच्या ७६ व्या हंगामाचे आयोजन केले. कोरोनामुळे मानवी जीवनार मोठा परिणाम झाला असून यामुळे झालेलं जागतिक आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीबाबतही यावेळी चर्चा होऊ शकते. तसंच दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला जाऊ शकतो. सध्या अफगाणिस्तानात सुरु असलेल्या घडामोडींवरही चर्चेची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत दहशतवादाचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. तिरूमूर्ती यांनी सांगितलं की, दहशतवादाबद्दल सांगायचं तर भारताने नेहमीच याविरोधात एकत्र येण्याची बाजू मांडली आहे. दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावर रणनिती तयार करण्यात आपली भूमिका महत्त्वाची राहिली आहे. याआधीही यासाठी काम केलं आहे आणि पुढेही करत राहू.

अफगाणिस्तानबाबत बोलताना तिरूमूर्ती म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आधीच स्पष्ट केलं आहे. एससीओ समिटमध्ये पंतप्रधानांनी सांगितलं होतं की अफगाणिस्तानात प्रत्येक वर्गाच्या प्रतिनिधित्वावर भर दिला होता. यामध्ये महिला आणि अल्पसंख्यांकाचा समावेश आहे. तिरूमूर्ती म्हणाले की, अफगाणिस्तानमधील लोक मोठ्या संकटात आहेत. तिथे दहशतवादासह इतरही अनेक आव्हाने आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT