Gotabaya Rajapaksa Marathi News Gotabaya Rajapaksa Marathi News
ग्लोबल

Sri Lanka Crisis : राष्ट्रपती राजपक्षे यांनी ईमेलद्वारे पाठवला राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (gotabaya Rajapaksa) यांनी गुरुवारी (ता. १४) राजीनामा संसदेच्या अध्यक्षांना ईमेल केला. गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनामाचे पत्र प्राप्त झाल्याचे श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे. बुधवारी पत्नीसह श्रीलंकेतून पळून गेलेल्या राजपक्षे यांना खासगी भेटीसाठी सिंगापूरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राजपक्षे यांनी आश्रय मागितला नाही किंवा त्यांना आश्रय दिला गेला नाही. ते सिंगापूरमध्ये खासगी दौऱ्यावर आले आहे. (Gotabaya Rajapaksa Resignation Marathi News)

श्रीलंकेच्या (Sri Lanka) संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी गुरुवारी गोटाबाया राजपक्षे यांना सांगितले की त्यांनी लवकरात लवकर अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा ते त्यांना काढून टाकण्यासाठी इतर पर्याय पाहतील. या इशाऱ्यानंतर राजपक्षे यांनी गुरुवारी राजीनामा पाठवला. माले, मालदीवमध्ये एक दिवस घालवल्यानंतर राजपक्षे सिंगापूरमध्ये दाखल झाले आहे.

श्रीलंकेची अर्थव्यवस्था हाताळण्यात सरकारच्या अपयशाविरुद्ध सार्वजनिक विद्रोह सुरू झाल्यानंतर राजपक्षे यांनी देश सोडून पलायन केले. सौदी एअरलाइन्स राजपक्षे यांना घेऊन सायंकाळी सात वाजल्यानंतर काही वेळाने सिंगापूर चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की, राजपक्षे यांना खाजगी भेटीसाठी सिंगापूरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.

आर्थिक संकटाला राजपक्षे जबाबदार

७३ वर्षीय राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (gotabaya Rajapaksa) यांनी बुधवारी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी देश सोडल्यानंतर काही तासांनंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे देशातील राजकीय संकट अधिक गडद झाले आणि निषेधाची एक नवीन फेरी सुरू झाली. आंदोलकांचा असा विश्वास आहे की देशाच्या अभूतपूर्व आर्थिक संकटाला राजपक्षे जबाबदार आहे. त्याच्यामुळे देशाची स्थिती बिघडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT