Coronavirus
Coronavirus Sakal
ग्लोबल

कोरोनाच्या उत्पत्तीचे कारण गुलदस्तात; शोध घेण्यास अमेरिकेला अपयश

पीटीआय

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूचा (Coronavirus) उगम (Source) कोठे झाला, याचा शोध (Research) घेण्‍यासाठी अमेरिकेसह (America) जागतिक आरोग्य संघटनेने जंग-जंग पछाडले असले तरी अद्याप कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना (आयसी) (IC) त्यात अपयश (Unsuccess) आले आहे. तसेच जैविक शस्त्र म्हणून हा विषाणू विकसित केलेला नाही, याची कबुलीही संघटनेने अहवालात दिली आहे.

कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत निर्माण केला किंवा निसर्गतः तो सर्वत्र पसरला यावर अमेरिकी गुप्तचर संस्थांमध्ये मतभिन्नता आहे. अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशावरून राष्ट्रीय गुप्तचर संचालकांनी हा अहवाल तयार केला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या या अहवालात म्हटले आहे की, ‘सार्स- सीओव्ही-२’ हा विषाणू २ नोव्हेंबर २०१९च्या सुमारास थोड्या प्रमाणात फैलावला. त्यानंतर चीनमधील वुहान शहरात कोविडचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याने उघडकीस आले. मात्र या विषाणूच्या उत्पत्तीवरून गुप्तचर संस्थांना एकमत होऊ शकले नाही.

‘जैविक शस्त्र म्हणून या विषाणूची निर्मिती झाले नाही, असे सांगतानाच ‘‘सार्स- सीओव्ही-२’ हा विषाणू आनुवंशिक रूपात तयार झालेला नाही, असा मतप्रवाहही अनेक संघटनांमध्ये दिसून आला. मात्र असा निष्कर्ष काढण्यास कोणताही सबळ पुरावा नसल्याचे दोन संस्थांचे म्हणणे आहे, असे या अवर्गीकृत अहवालात नमूद केले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांचे नाव या घेतलेले नाही.

जगाला उत्तर मिळाले पाहिजे आणि ते मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. जबाबदार देश जगाच्या अशा प्रकारच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाहीत. जागतिक साथींना आंतरराष्ट्रीय सीमांचे बंधन नसते. कोरानाची साथ रोखण्यासाठी हा विषाणू कोठून आला, याची माहिती मिळणे आवश्‍यक आहे.

- ज्यो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT