Vladimir Putin and Volodymyr Zhelensky Vladimir Putin and Volodymyr Zhelensky
ग्लोबल

Russia-Ukraine युध्दाबाबत मोठी बातमी! व्लादिमीर पुतीन युक्रेनसोबत चर्चेसाठी तयार, पण 'ही' घातली अट

रशियाकडून युक्रेनसोबतचं युद्ध शुक्रवार ते शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत युद्ध थांबवलं जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

तब्बल 10 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) वाटाघाटी सुरू होऊ शकतात. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चर्चेसाठी तयार असल्याचं वृत्त आहे.

Russia-Ukraine War News : रशियाकडून युक्रेनसोबतचं युद्ध शुक्रवार ते शनिवारच्या मध्यरात्रीपर्यंत युद्ध थांबवलं जाणार आहे. या दरम्यान ऑर्थोडॉक्स ख्रिसमस साजरा केला जाणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्या संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिलीये.

मात्र, युक्रेननं रशियाच्या या शस्त्रसंधीच्या घोषणेला फेटाळलं असून, ही घोषणा म्हणजे ‘जाळ्यात अडकवण्याचा प्रकार’ असल्याचं म्हटलंय. AFP या आंतरराष्ट्रीय वृत्तसेवा संस्थेच्या माहितीनुसार, पेट्रिएक किरिल यांनी ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या निमित्तानं शस्त्रसंधीचं आवाहन केलं होतं.

आता युध्दाबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. तब्बल 10 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) वाटाघाटी सुरू होऊ शकतात. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चर्चेसाठी तयार असल्याचं वृत्त आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी अटीही घातल्या आहेत. याबाबतची माहिती क्रेमलिननं जारी केलीये. रशियानं गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली होती.

क्रेमलिनच्या वृत्तात पुतीन यांनी तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांना सांगितलंय की, युक्रेननं मॉस्कोचा संलग्नित प्रदेश स्वीकारल्यास ते चर्चेसाठी तयार आहेत. सध्या रशियन सैन्यानं पूर्व आणि दक्षिण युक्रेनचा मोठा भाग व्यापला आहे. डोनेस्तक, लुगान्स्क, झापोरिझिया आणि खेरसन प्रदेशही ताब्यात घेतल्याचा दावा क्रेमलिननं केलाय.

युक्रेन-रशिया युद्ध 36 तासांसाठी थांबवा, पुतीन यांची घोषणा

पुतीन यांनी गुरुवारी मॉस्कोच्या सशस्त्र दलांना या आठवड्याच्या शेवटी रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिसमसच्या सुट्टीसाठी युक्रेनमध्ये 36 तासांच्या युद्धविरामाचे आदेश दिले, असं द लँग्वेजनं म्हटलंय. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पेट्रिएक किरिल यांच्या प्रस्तावानंतर हा आदेश आला आहे. संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांना उद्देशून पुतीन यांचा आदेश क्रेमलिनच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT