Narendra Modi : भाजपचे सगळेच नेते PM मोदींसमोर कुत्र्याच्या पिल्लासारखे आहेत; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

'भाजपचे सगळेच नेते पंतप्रधान मोदींसमोर थरथर कापतात, त्यांना घाबरतात.'
Narendra Modi Siddaramaiah
Narendra Modi Siddaramaiahesakal

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान केलंय. मुख्यमंत्री बोम्मई (Basavaraj Bommai) आणि कर्नाटकचे भाजपचे इतर नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर (Narendra Modi) कुत्र्याच्या पिलासारखं आहेत. त्यांच्यासमोर सगळे थरथर कापतात, असं त्यांनी म्हटलंय.

काँग्रेस पक्षाच्या रॅलीला संबोधित करताना सिद्धरामय्या म्हणाले, '15 व्या वेतन आयोगानं कर्नाटकला विशेष भत्ता म्हणून 5,495 कोटी रुपये मिळावेत अशी शिफारस केली होती. परंतु, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी तो निधी दिला नाही. हे पैसे देता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.'

Narendra Modi Siddaramaiah
Yogi Adityanath : 'बुलडोजर' शांततेचं प्रतीक म्हणून सिद्ध होऊ शकतं; मुंबईत असं का म्हणाले CM योगी?

15 व्या वेतन आयोगानं राज्याला 5,495 कोटी रुपये मिळतील, अशी शिफारस केली. परंतु, आजपर्यंत पैसे मिळालेले नाहीत. पण, हे पैसे पंतप्रधानांकडं मागण्याची हिम्मत या भाजप नेत्यांमध्ये नाही. हे लोक मोदींसमोर बोलायला घाबरतात. ते त्यांच्यासमोर कुत्र्याच्या पिलासारखं आहेत, असा घणाघातही सिद्धरामय्यांनी केलाय.

Narendra Modi Siddaramaiah
Air India : विमानात महिलेच्या अंगावर कपडे काढून लघवी करणाऱ्या प्रवाशाची ओळख पटली; कोण आहे आरोपी?

याआधी कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कुमार कटील म्हणाले होते, 'रस्ते आणि नाले हे छोटे मुद्दे आहेत. आमचं प्राधान्य लव्ह जिहादला आहे. लोकांनी रस्ते आणि नाल्यांवर नव्हे तर लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.' भाजप प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी टीका केलीये. ते म्हणाले, 'हे त्यांचं अत्यंत चुकीचं विधान आहे. या लोकांचं प्राधान्य विकास नसून द्वेष पसरवण्याला असल्याचं दिसून येतं. या लोकांना देश एकत्र करण्याऐवजी तोडायचा आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com