Sri Lanka protester 
ग्लोबल

कहर! श्रीलंकेत आंदोलकांनी थाटलं 'सरकार', नकली कॅबिनेट बैठकही घेतली

सकाळ डिजिटल टीम

कोलंबो - श्रीलंकेत संतप्त आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपतींचे निवासस्थान आणि नंतर राष्ट्रपतींचे सचिवालय ताब्यात घेतले होते. यानंतर रविवारी आंदोलक पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या टेम्पल ट्री येथेही पोहोचले होते. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा देईपर्यंत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे निवासस्थान सोडणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. (Sri lanka crisis news in Marathi)

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांची सरकारविरोधी निदर्शने सुरूच आहेत. रविवारी विरोधकांनी मंत्रिमंडळाची बनावट बैठक घेतली. बैठकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत देशाच्या आर्थिक संकटावरही चर्चा केली. याशिवाय, मॉक कॅबिनेट बैठकीत आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरावर जाळपोळ करण्याबाबत चर्चा केली.

आंदोलकांनी IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) सोबत केलेल्या मॉक मीटिंगमध्ये एका विदेशी तरुणाला सामील केलं होतं. आंदोलकांनी राष्ट्रपतीभवन ताब्यात घेतल्यानंतर एक परदेशी युवक तिथं फिरायला गेला होता. त्याला पकडून आंदोलकांनी मॉक मिटिंगमध्ये सामील करून घेतलं. राष्ट्रपती भवनावर ताबा घेतल्यानंतर आंदोलक राष्ट्रपतींच्या बेडरूम, स्विमिंग पूल, जिममध्ये फिरताना धमाल करताना दिसून आले होते.

आंदोलक शनिवारी हिंसक झाल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढला होता. ते कुठे गेले याची माहिती नाही. मात्र गोटाबाया राजपक्षे आपल्या कुटुंबासह भूमिगत झाल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT