Sri Lanka Crisis : राष्ट्रपती गोताबाया राजेपक्षे राजीनामा देणार असल्याचं निश्चित; अधिकृतरित्या पंतप्रधानांना कळवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gotabaya Rajapaksa
Shri Lanka Crisis : राष्ट्रपती राजेपक्षे राजीनामा देणार असल्याचं निश्चित

Sri Lanka Crisis : राष्ट्रपती राजेपक्षे राजीनामा देणार असल्याचं निश्चित

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजेपक्षे यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं पण आता ते राजीनामा देणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत त्यांनी अधिकृतरित्या पतंप्रधान रनील विक्रमसिंगे यांना तसं कळवलं आहे. (Srilanka President Gotabaya Rajapaksa has officially annaunced that he will be resigning)

पार्लमेंटरी स्पीकर अबेयावर्दने यांनी यापूर्वी याबाबत माहिती देताना सांगितलं होतं की, हजारो आंदोलक नागरिकांनी राष्ट्रपतींच्या सरकारी निवासस्थानाची तोडफोड केल्यानंतर राजेपक्षे यांनी १३ जुलै रोजी आपण राजीनामा देणार असल्याचं आपल्याला कळवलं होतं.

हेही वाचा: Maharashtra Politics: सुनावणी लांबवणीवर पडणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष

शनिवारी ९ जुलै रोजी निदर्शकांनी राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला होता. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत झालेल्या राष्ट्रपती राजेपक्षे आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी पद सोडले पाहिजे या निर्णयाबद्दल राजपक्षे यांना कळवले होते, असं स्पीकर यांनी एका निवदेनाद्वारे संध्याकाळी सांगितलं होतं. त्यानंतर राष्ट्रपतींनी या निर्णयाचा स्विकार केला होता.

Web Title: Srilanka President Gotabaya Rajapaksa Has Officially Annaunced That He Will Be Resigning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global news