Sri Lanka Presidential Election News Sri Lanka Presidential Election News
ग्लोबल

श्रीलंका : राष्ट्रपतीपदाची निवडणूक २० जुलै रोजी; १८ पर्यंत नामांकन

सकाळ डिजिटल टीम

श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकटाच्या (Economic crisis) पार्श्वभूमीवर नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैपर्यंत नामांकन करता येईल. तसेच २० जुलै रोजी या पदासाठी मतदान होणार आहे, असे श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांच्या हवाल्याने सांगितले आहे. (Sri Lanka Presidential Election News)

राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केला आहे. यानंतर राष्ट्रपतींनी १३ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची (Sri Lanka) परिस्थिती बिकट झाली आहे. रस्त्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत सर्वत्र आंदोलक दिसत आहेत.

पेट्रोल, वीज, अन्न यासारख्या मूलभूत सुविधांसाठी लोकांचा संघर्ष सुरू आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. याचा फटका नेत्यांना सहन करावा लागत आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावर ९ जुलै रोजी आंदोलकांनी हल्ला केला होता. आता श्रीलंकेत सर्वत्र लष्कर तैनात करण्यात आले आहे.

गोटाबाया राजपक्षे (gotabaya rajapaksa) यांच्यावर मार्च महिन्यापासून राजीनामा देण्यासाठी दबाव आहे. एप्रिलमध्ये विरोधकांनी त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कब्जा केल्यापासून ते अध्यक्षीय निवासस्थान हे निवासस्थान व कार्यालय म्हणून वापरत होते. आंदोलकांचा विरोध पाहता राष्ट्रपती राजपक्षे यांनी शुक्रवारीच घर रिकामे केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT