ग्लोबल

वेडे परदेशी गेल्यावर कामावर परता; तालिबानचं अधिकाऱ्यांना फर्मान

सकाळ डिजिटल टीम

काबूल : सत्ता बळकावून दहा दिवस होत आले तरी परदेशी नागरिकांप्रमाणेच अफगाणिस्तान सोडण्यास सामान्य नागरिकही अधीर बनले आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना कामावर परतण्याचे फर्मान तालिबानने काढले. वेडे परदेशी निघून जात आहेत. ते गेल्यावर तुम्ही कामावर परता, असे बजावण्यात आले. अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांचा पाठिंबा असलेल्या सरकारसाठी हजारो अधिकाऱ्यांनी काम केले. आपल्यावर सूड उगवला जाईल अशा भीतीने ते अफगाणिस्तान सोडण्यास कसून प्रयत्न करीत आहेत.

अर्थ खात्यातील तज्ज्ञ अश्रफ हैदरी चिंताग्रस्त होऊन घरी बसले होते. त्याचवेळी त्यांना तालिबानच्या एका कमांडरचा फोन आला. देश चालविण्यासाठी मदत व्हावी म्हणून कामावर परतण्याचा आदेश त्याला देण्यात आला, मात्र तालिबान्यांनी सूड उगविला तर आपला बळी जाईळ अशी भीती त्यांना वाटत आहे. देशातील ३४ प्रांतांना निधी वितरित करण्याचे काम हैदरी यांच्याकडे आहे. ते ४७ वर्षांचे आहेत. अनाठायी भीती बाळगू नका किंवा गायब होऊ नका. वेडे परदेशी गेल्यावर देश चालविण्यासाठी अधिकाऱ्यांना तुमची गरज आहे, असे तालिबानी कमांडरने सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.

सत्तेवरील पहिल्या कार्यकाळात तालिबानने कडक इस्लामी कायदे राबविले होते. तेव्हा हैदरी यांना दाढी वाढविली होती. रविवारी दूरध्वनी आल्यानंतर नव्या साहेब मंडळींना भेटण्यासाठी हैदरी यांनी सूटाऐवजी पारंपरिक अफगाण पोशाख घातला. कुटुंबीयांचे धाबे दणाणून जाऊ नयेत म्हणून त्यांनी सोमवारी घर सोडताना कामावर जात असल्याचे त्यांना सांगितले नाही.

कार्यालयात काय घडले याविषयी हैदरी म्हणाले की, तीन तालिबानी अधिकाऱ्यांनी माझे स्वागत केले. लवकरच माझे इतर सहकारी सहभागी होतील, प्रांतांना निधी पाठविण्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करावे असे मला सांगण्यात आले. सुरक्षेची सूत्रे असलेल्या एका अधिकाऱ्याने नमाजसाठीची सुट्टी अनिवार्य असल्याचे सांगितले. कार्यालयाच्या इमारतीत त्यांनी बंदुका आणल्या नव्हत्या. तुमच्या अनुभवातून आम्हाला शिकता येईल असे त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. काही सहकारी देशबांधव देश सोडण्यास अधीर झाले असताना हैदरी यांनी थांबण्याचे ठरविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या मार्गातील 'मोठा' अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशास २८ पर्यंत मुदतवाढ

Pune News : राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण व तुलना करावी; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

कॅन्सरला हरवलं पण मृत्यूशी झुंज अपयशी; 'रेडी' फेम अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT