20 हजार अफगाण निर्वासितांना Airbnb अमेरिकेत देणार मोफत घर

Afghan refugees
Afghan refugeesANI
Summary

तालिबान्यांनी ताबा मिळवला असल्याने अफगाणिस्तानमधील स्थिती चिंताजनक आहे. अफगाण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून देश सोडण्यासाठी ते धडपडत आहेत.

वॉशिंग्टन- तालिबान्यांनी ताबा मिळवला असल्याने अफगाणिस्तानमधील स्थिती चिंताजनक आहे. अफगाण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून देश सोडण्यासाठी ते धडपडत आहेत. तालिबान्यांनी संपूर्ण देशावर ताबा मिळवला असला तरी काबुलमधील विमानतळावर आणखी त्यांचे नियंत्रण प्रस्थापित झालेले नाही. त्यामुळे हजारो अफगाण नागरिकांनी विमानतळाकडे धाव घेतली आहे. अमेरिका अनेक अफगाण लोकांना देशाबाहेर काढत आहे. त्यातच Airbnb या अमेरिकी कंपनीने अफगाण निर्वासितांना मोफतमध्ये घरे पुरवणार असल्याची घोषणा केली आहे. सीएनएनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (International Latest News)

Airbnb ने जाहीर केलंय की 20,000 अफगाण निर्वासितांना मोफतमध्ये घर दिले जाणार आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन चेस्की (CEO Brian Chesky ) म्हणाले की, 'प्रोगॅम लगेच सुरुवात करण्यात येईल आणि यासाठीचा सर्व खर्च कंपनी उचलेल. अफगाण निर्वासितांचे अमेरिकेत आणि इतर ठिकाणी स्थलांतर आणि पुनर्वसन करणे हे सध्याच्या घडीचे सर्वात मोठे मानवीय संकट आहे. त्यामुळे याबाबत पुढाकार घेणे आम्ही आमचं कर्तव्य समजतो.'

Afghan refugees
Afghan refugeesesakal
Afghan refugees
''काँग्रेस-राष्ट्रवादीची काय औकात, भांडण लावून सत्तेत आले''

कंपनी एनजीओ आणि Airbnb.org या ना नफा कंपनीसोबत अफगाण लोकांना घरं पुरवण्यासाठी मदत करणार आहे. तालिबान्यांनी संपूर्ण देशावर नियंत्रण मिळवल्यानंतर हजारो अफगाण लोकांना देश सोडायचा आहे. त्यासाठी ते विविध मार्गानी प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने काही लोकांना विमानाच्या साहाय्याने दुसरीकडे स्थलांतरित केले आहे. ब्रायन चेस्की म्हणालेत की, 'कंपनीने उचललेले पाऊन इतर कंपन्याच्या प्रमुखांना प्ररित करेल अशी आशा आहे. आपण आणखी वेळ वाया घालवू शकत नाही.' दरम्यान, Airbnb ही कंपनी पर्यटनासाठी आलेल्या लोकांना भाडेतत्वावर घर सेवा देत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com