Terrorist Attack 
ग्लोबल

Terrorist Attack : युगांडातील एका शाळेवर दहशतवाद्यांचा हल्ला, 25 विद्यार्थी ठार

Sandip Kapde

Terrorist Attack On A School In Uganda: गेल्या काही वर्षांत आफ्रिकन देशांमध्ये दहशतवाद पसरला असून त्याचा परिणामही दिसून येत आहे. अनेक आफ्रिकन देश दहशतवादाच्या विळख्यात अडकले आहेत. या देशांमध्ये दररोज दहशतवादी हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत.

शुक्रवारी युगांडामध्ये एका शाळेवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम युगांडातील मपोंडवे येथील लुबिरिरा माध्यमिक विद्यालयात हा हल्ला झाला. या हल्ल्यात 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Terrorist Attack On A School In Uganda)

अनेक दहशतवादी संघटनांनी आफ्रिकन देशांमध्येही आपली पाळेमुळे पसरवली असून त्यांनी स्थानिक लोकांनाही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे या देशांतील वातावरणही बिघडते. शुक्रवारी असाच दहशतवादाचा प्रकार आफ्रिकन देश युगांडामध्ये पाहायला मिळाला. (Global News)

युगांडाच्या पोलिसांनी सांगितले की, युगांडाची दहशतवादी संघटना अलायड डेमोक्रॅटिक फोर्सेस (एडीएफ) मपोंडवे येथील लुबिरिरा माध्यमिक विद्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सामील आहे. ही दहशतवादी संघटना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आहे आणि इस्लामिक दहशतवादी संघटना ISIS शी तिचे संबंध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT