US Default esakal
ग्लोबल

US Default: अमेरिकेकडे कर्ज फेडण्यासाठी देखील पैसे नाहीत, जूनपर्यंत येणार मोठे आर्थिक संकट!

Sandip Kapde

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे जग मोठ्या आर्थिक संकटाकडे वळत आहे. यूएस ट्रेझरी सेक्रेटरी जॅनेट येलेन यांच्या म्हणण्यानुसार, यूएस फेडरल सरकारला या वर्षी जूनमध्ये बिल भरण्यासाठी पैशांची कमतरता भासू शकते. अमेरीकेला लवकरच त्यांची कर्ज मर्यादा वाढवावी लागणार आहे. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. याबाबात राष्ट्रध्यक्ष ज्यो बिडेन यांनी ९ मे रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बिडेन यांनी काँग्रेसच्या चार प्रमुख नेत्यांना ९ मे रोजी व्हाईट हाऊसमध्ये संकटावर मात करण्यासाठी आमंत्रित केले. बिडेन यांनी रिपब्लिकन हाऊसचे अध्यक्ष केविन मॅककार्थी, हाऊस डेमोक्रॅटिक नेते हकीम जेफरीज, सिनेटचे बहुसंख्य नेते चक शूमर आणि रिपब्लिकन नेते मिच मॅककॉनेल यांना आमंत्रित केले आहे.

हाऊस रिपब्लिकन कर्ज मर्यादा वाढवण्याच्या बदल्यात सखोल खर्च कपात आणि इतर धोरणात्मक बदलांची मागणी करत आहेत. परंतु बिडेन यांनी स्पष्ट सांगितले आहे की ते कर्ज मर्यादा वाढीवर निर्णय घेणार  नाहीत. परंतु ते बजेट कपातीवर चर्चा करतील.

या नवीन अंदाजामुळे यूएस डीफॉल्टचा धोका लक्षणीय वाढला आहे, ज्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. देशावरील या संकटानंतर वॉशिंग्टनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन नेत्यांमध्ये कर्जाची मर्यादा वाढविण्याच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा होण्याची शक्यता आहे.

युनायटेड स्टेट्स ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांनी हाऊस स्पीकर केविन मॅककार्थी यांना एक पत्र पाठवले आहे आणि त्यांना चेतावणी दिली आहे की जर काँग्रेसने कर्ज मर्यादा वाढवली नाही, तर फेडरल सरकार १ जूनपर्यंत आपली खर्च मर्यादा कमी करू शकते.

या पत्रात ट्रेझरी सेक्रेटरी येलेन म्हणाले , उपलब्ध डेटानुसार जूनच्या सुरुवातीपर्यंत सरकारकडे त्याचा खर्च भागवण्यासाठी पैसे नसतील, त्यापूर्वी देशाच्या संसदेची कर्ज मर्यादा वाढवायला हवी. सध्याचे अंदाज लक्षात घेता, काँग्रेसने कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी शक्य तितक्या लवकर कार्य करणे अत्यावश्यक आहे, जे दीर्घकालीन निश्चितता प्रदान करेल.

२०११ मध्ये देखील आशात कर्ज कमाल मर्यादेच्या लढाईने देशाला डिफॉल्टच्या उंबरठ्यावर नेले होते. यामुळे देशाच्या अव्वल दर्जाच्या क्रेडिट रेटिंगमध्ये घट झाली होती. असे असले तरी, यूएसच्या कर्ज मर्यादेची लढाई पुढील अनेक वर्षे टिकून राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT