donald_20trump_ 
ग्लोबल

मुक्त अन् निष्पक्ष निवडणुका अमेरिकी लोकशाहीच्या रक्तात; न्यायालयाने ट्रम्पना सुनावले

सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पेनसिल्व्हानिया, राज्यातील निकालाविरोधात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखल केलेली आव्हान याचिका पेनसिल्व्हेनियाच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या खटल्यावरील कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम राखला आहे.

निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास तयार नसलेल्या ट्रम्‍प यांना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. ‘वकील नव्हे तर मतदार अध्यक्षांची निवड करतात, असे सांगत ट्रम्प यांनी निकालाला आव्हान दिले होते. फिलाडेल्फियातील तिसऱ्या न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या समितीपुढे शुक्रवारी सुनावणी झाली. ट्रम्प यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे मत समितीने नोंदविले आहे. मतदारांबरोबर धोका झाला असल्याचा ट्रम्प यांनी केला आहे. पेनसिल्व्हानियातील हा निकाल लागण्याच्या चार दिवस आधी या राज्यातून ज्यो बायडेन विजयी झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

वॅक्सिनसाठीचे बॉक्स बनणार गुजरातमध्ये; मोदींनी स्वीकारला लक्झेमबर्गचा प्रस्ताव 

निवडणुकीपूर्वी विजयाचे दावे करणाऱ्या ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याकडून स्वीकारावा लागलेला पराभव जिव्हारी लागला आहेत. त्यामुळे निकालात बनवेगिरी झाल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी अमेरिकेतील अनेक राज्यातील निकालांविरोधात आव्हान दिले होते. पण त्यासंबंधीचे कोणतेही पुरावे त्यांनी दिले नव्हते. यामुळे बहुतेक न्यायालयांनी त्यांच्या आव्हान याचिका फेटाळल्या आहेत.

मुक्त अन् निष्पक्ष निवडणुका हे आमच्या लोकशाहीच्या रक्तात आहे. यात गैरप्रकार झाल्याचा आरोप करणे गंभीर आहे, मात्र तसे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. आरोप हे अत्यंत स्पष्ट हवेत व दुसरे म्हणजे ते सिद्ध करण्यासाठी पुरावे असणे आवश्‍यक आहे. आम्हाला असे काहीही पुरविलेले नव्हते, असं न्यायाधीश स्टिफन्स बायबस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT